वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत मुलींना भविष्यात तब्बल ६५ लाख रुपये मिळतील !

केंद्र सरकारने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केलेली योजना म्हणजे ‘सुकन्या समृद्धी योजना ‘ ही मुलींच्या पालकांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि विश्वासार्ह योजना आहे. मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पालकांना फार मोठया प्रमाणात पैसे लागतात , त्यासाठी ही योजना ज्या पालकांना मुली किंवा मुलगी आहे. त्यांच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून दिलासा देते. अगदी दरमहा काहीशा रकमेची नियमित बचत करून भविष्यात ६५ लाखाहून अधिक रक्कम मिळविण्याची संधी ही  योजना देते.

सुकन्या समृद्धी योजना १५ वर्षासाठी सक्रिय गुंतवणूक स्वीकारते , पण बँकेत खाते २१ वर्षापर्यंत सुरु राहतात. या गुंतवणुकीवर, जरी ७.६% दराने व्याज धरले, तरी रु. ४३,४३,७०१ इतकी व्याजाची कमाई होईल. म्हणजेच मुलगी २१ वर्षांची झाल्यावर तिच्या खात्यात रु. ६५,९३,७०१ इतकी मोठी रक्कम जमा होणार आहे. आणि ही रक्कम पूर्णतः टॅक्स फ्री असल्याने, संपूर्ण लाभ तिला मिळतो. ही योजना पालकांना आर्थिक सुरक्षिततेसोबत मानसिक शांतताही देते.

Central government New Scheme for girls

सुकन्या समृद्धी योजना १५ वर्षांसाठी सक्रिय गुंतवणूक स्वीकारते, पण खाती २१ वर्षांपर्यंत सुरू राहतात. म्हणजेच १५ वर्षांनंतर गुंतवणूक थांबवली तरी पुढील ६ वर्षे तुमच्या गुंतवणुकीवर व्याज मिळत राहते. ही योजना ‘ईईई’ श्रेणीत मोडते (Exempt-Exempt-Exempt) म्हणजे गुंतवणूक, व्याज आणि अंतिम परतावा तिन्ही गोष्टींवर कोणताही कर लागत नाही.

जर तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा मान्यताप्राप्त बँकेत मुलीच्या नावाने हे खाते उघडता येते. फॉर्म, ओळखपत्र, जन्माचा दाखला आणि पालकाचा फोटो याच्या आधारे खाते सहज उघडता येते. नियमित बचतीच्या सवयीबरोबरच ही योजना आर्थिक शिस्तही शिकवते. शासनाच्या या योजनेमुळे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या मोहिमेचाही खऱ्या अर्थाने विस्तार होतो आहे. कमी उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी ही योजना आशेचा किरण ठरू शकते. शिक्षण आणि लग्न या महत्त्वाच्या टप्प्यांवर मोठी रक्कम हातात असणे हीच सध्या काळाची गरज आहे आणि सुकन्या समृद्धी योजना ही गरज पुरवते.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

MPSC Talathi Bharti 2026

आनंदाची बातमी ! MPSC तलाठी भरती एकूण १५३९ रिक्त जागा त्वरित जाणून घ्या परीक्षेचे स्वरूप ! Talathi Bharti 2026 for 1539 Posts !

Great news! The MPSC (Maharashtra Public Service Commission) has initiated the recruitment process for the …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *