वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मोठी आनंदाची बातमी !! दिल्ली विकास प्राधिकरणात मेगा भरती ; तब्बल १ हजार ३८३ रिक्त जागा ! चला तर मग त्वरित अर्ज करा

दिल्ली विकास प्राधिकरण (DDA ) विभागात  एकूण 1,383 रिक्त जागेसाठी विविध पदांची मेगा भरती सुरु ! १० उत्तीर्ण आणि ITI झालेले या भरती साठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी. अर्ज करण्यापूर्वी वेबसाईट वर दिलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती खाली दिलेली आहे . 

दिल्ली विकास प्राधिकरण (DDA) ने गट अ, ब आणि क अंतर्गत एकूण 1,383 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे कनिष्ठ अभियंता (Junior Engineer), सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Section Officer), पटवारी (Patwari) यासह विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण पासून पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार पात्र आहेत.

भरती अंतर्गत समाविष्ट पदे

सहाय्यक कार्यकारी अभियंता (Assistant Executive Engineer)

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)

सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Section Officer)

स्टेनोग्राफर ग्रेड D (Stenographer Grade D)

कायदेशीर सहाय्यक (Legal Assistant)

पटवारी (Patwari)

नायब तहसीलदार (Naib Tehsildar)

मल्टी-टास्किंग स्टाफ (Multi-Tasking Staff)

उपसंचालक (Deputy Director)

सहाय्यक संचालक (Assistant Director)

कार्यक्रमकर्ता (Programmer)

सर्व्हेअर (Surveyor)

कनिष्ठ अनुवादक (Junior Translator)

आर्किटेक्चरल असिस्टंट (Architectural Assistant)

प्लॅनिंग असिस्टंट (Planning Assistant)

सहाय्यक संचालक (मंत्रालय) (Assistant Director – Ministerial)

सहाय्यक सुरक्षा अधिकारी (Assistant Security Officer)

शैक्षणिक पात्रता:
प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता वेगळी आहे. यामध्ये:

दहावी उत्तीर्ण

ITI प्रमाणपत्र

डिप्लोमा कोर्सेस

संबंधित शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी

वेतनश्रेणी
या पदांकरिता वेतन 7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या (CPC) नियमानुसार स्तर 1 ते स्तर 11 पर्यंत निश्चित करण्यात आले आहे.

अर्ज प्रक्रिया
या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी लवकरच सुरू होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी dda.gov.in या दिल्ली विकास प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपला अर्ज सादर करावा.

संपूर्ण तपशील व अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

ICT मुंबई – प्रकल्प सहाय्यक पदावर नोकरीची संधी

ICT Mumbai RGSTC PA Job 2026 - Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till the last date......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *