IOCL मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती; त्वरित करा अर्ज !
IOCL Recruitment 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर ही एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रिया सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
ही भरती प्रक्रिया इंडियन ऑईल कॉरपोरेशन लिमिटेडकडून राबवली जातंय. अप्रेंटिस पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 2 ऑगस्ट 2024 पासून सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
ही भरती प्रक्रिया 400 पदांसाठी सुरू आहे. iocl.com. या साईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. तिथेच तुम्हाला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. मुळात म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आली असून 18 ते 24 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. सरकारी नियमानुसार प्रवर्गातील उमेदवाराला वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. सर्व प्रथम ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल
मेडिकल फिटनेस चाचणी होईल. यानंतरच उमेदवाराची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. भरतीची सविस्तर माहिती ही आपल्याला अधिसूचनेमध्ये वाचण्यास मिळेल.
Achal ramchandra shiurkar