वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठी भेट; ऑगस्ट महिन्यात मिळणार दुहेरी लाभ ! जाणून घ्या सविस्तर

फडणवीस सरकारडून आपल्या लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट मिळणार आहे. लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्यात दुहेरी लाभ मिळणार . म्हणजे लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार , एकाच वेळी खात्यात ३००० रुपये जमा होतील. हे पैसे बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी मिळण्याची शक्यता आहे. या बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने सुरु केली होती. या योजनेला आता एक वर्ष पूर्ण झाले . या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये लाभ दिला जातो. आतापर्यंत महिलांना १२ हफ्ते मिळाले आहे. १३ वा आणि १४ वा हफ्ता ऑगस्ट महिन्यात एकत्रच मिळणार आहे. परंतु ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे.

Ladki Bahin will get gift from government 2025

जुलैचा हप्ता कधी मिळणार आणि जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे हप्ते सोबतच मिळू शकतात का असे काही प्रश्न लाडक्या बहिणीकडून उपस्थित केले जात आहेत. आता ऑगस्ट महिन्यात फडणवीस सरकार लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दुहेरी लाभ मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा मोठा सण साजरा होणार आहे. दरम्यान याच रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे पैसे सोबतच दिले जाणार असल्याचा दावा केला जातोय.

वास्तविक गेल्या वर्षी 17 ऑगस्ट 2024 रोजी राज्यातील लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना पहिल्यांदा जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे एकत्रितरीत्या देण्यात आले होते. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन शिंदे सरकारने या योजनेचे सुरुवातीचे दोन हप्ते सोबतच जमा केले होते.

दरम्यान, गेल्या वर्षी ज्याप्रमाणे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना एकाच वेळी दोन हप्त्यांचा लाभ मिळाला त्याच धर्तीवर याही वर्षी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे सोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.

नऊ ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम लाडक्या बहिणींना दिले जाऊ शकते असेही बोलले जात आहे. मात्र असे असले तरी अजूनही या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही.

प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून देखील या संदर्भात कोणतीच माहिती समोर आलेली नाही. यामुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे सोबतच मिळणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

आर्या कार्स गडचिरोली – DE/इतर ; ७ पदभरतींसाठी संपर्क करा !

Arya Cars Gondia Recruitment 2025 - Maruti Car Dealers Arya Cars, Gondia invites Online applications & has arranged.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *