वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे १५०० रुपये कधी मिळणार ? हे लगेच जाणून घ्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याच्या हफ्त्याचे १५०० रुपये कधी महिलांच्या खात्यात जमा होतील ? असा प्रश्न लाडक्या बहिणीनं कडून विचारला जात आहे.  निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana November Hafta update

लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तरीही अजून नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

“लाडकी बहीण योजनेचा हप्ता नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूकीपूर्वी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २-३ डिसेंबर रोजी निवडणुका होणार आहेत. त्याआधीच महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. लवकरच घोषणा केली जाईल.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी मुदतीपूर्वी केवायसी करायचे आहे

लाडकी बहीण योजनेत ई केवायसी प्रक्रिया केली जाणार आहे. या ई केवायसी प्रोसेसमधून महिलांच्या माहितीची पडताळणी केली जाणार आहे. यातून ज्या महिला निकषात बसत नाही त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. यामध्ये तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न, एकापेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत तर नाही ना याची माहिती मिळणार आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Ladki Bahin Yojana new update 2025

लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना ३००० रुपये वाटप सुरु !

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिना १५०० रुपये दिले जातात. जेव्हा दोन महिन्याचे हफ्ते एकत्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *