लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यास सांगितले होते. मात्र, आता अंगणवाडी सेविकांनी या कामासाठी नकार दिला आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आता प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जाची पडताळणी करावी लागणार आहे. दरम्यान, आता अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन पडताळणी करण्यास नकार दिला आहे. अंगणवाडी सेविकांच्या संघटनेने हा निर्णय घेतला आहे. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
अंगणवाडी सेविकांचा प्रत्यक्ष पडताळणीसाठी नकार (Anganwadi Sevika Refuse to do Physical Verification of Ladki Bahin Yojana) : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी केवायसी करुनही त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेलेल नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी होती. केवायसीमध्ये प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्याने हा घोळ झाल्याचे लक्षात आले आहे. त्यानंतर आता लाभार्थी महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, आता अंगणवाडी सेविकांनी याबाबत आपले मत स्पष्ट केले आहे.
अंगणवाडी सेविकांनी सांगितलंय की, आम्ही फिजिकल व्हेरिफिकेशनचे काम देऊ नका. अंगणवाडी सेविकांना याआधीचेच मानधन जमा झालेले नाही. त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी हा निर्णय घेतला आहे.
अंगणवाडी सेविकांना महिला व बालविकास अधिकाऱ्यांना पत्र लिहलं आहे. याबाबत त्यांनी म्हटलंय की, अंगणवाडी सेविकांना महिलांना फॉर्म भरण्यास मदत केली आहे. या एका अर्जामागे अंगणवाडी सेविकांना ५० रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले होते. परंतु हे पैसे अंगणवाडी सेविकांना मिळालेले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविका मानधनासाठी फेऱ्या घालत आहेत. सेविकांनी काम केले आहे. मात्र त्यांना पैसे मिळण्यास उशिर होत आहे.
अंगणवाडी सेविकांच्या संघटनेने म्हटलंय की, केवायसी करताना महिलांचे व्हेरिफिकेशन एकदा झाले आहे. मात्र, दुसऱ्यांदा फिजिकल व्हेरिफिकेशन करायला गेल्यावर लाभार्थी महिलांची नाराजी व्यक्त करावी लागेल. त्यामुळे आम्हाला हे काम देऊ नका, असं त्यांनी म्हटलंय.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati
