आनंदाची बातमी लाडक्या बहिणी साठी आहे. लाडक्या बहिणींचा हफ्ता २५० रुपयांनी वाढविण्यात आलेला आहे. आता हा हफ्ता कोणत्या लाडक्या बहिणीचा वाढविला आहे. या बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात मागच्या वर्षी पासून झाली. या योजनेचा लाभ महिलांना जुलै २०२४ पासून मिळत आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये येतात. शासनाकडून महिलांना एक आर्थिक मदत दिली जाते. आता या योजनेअंतर्गत महिलांचा दरमहा हफ्ता वाढविण्यात आलेला आहे. या बद्दल ची अधिक माहिती खाली दिलेली आहे.
जुलै २०२४ ते मे २०२५ पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात ऐकूण ११ हफ्ते जमा करण्यात आलेले आहे. आणि या योजनेचा पुढचा १२ वा हफ्ता जून अखेरीस लाडक्या बहिणींच्या सरळ खात्यात जमा होईल. अशी बातमी दिली जात आहे .

सध्या राज्यातील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये प्रति महिना याप्रमाणे लाभ दिला जातोय. पण, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीकडून लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील अशी घोषणा करण्यात आली आहे.
मात्र अजून पर्यंत 2100 रुपयां संदर्भात सरकारकडून कोणताच निर्णय झालेला नाही. अशातच आता मध्यप्रदेश राज्यातील लाडली बहना योजनेच्या पात्र महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना ही मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू झाली आहे.
दरम्यान आता मध्य प्रदेश राज्यातील लाडक्या बहिणींच्या हफ्त्यात वाढ करण्यात आली आहे. मध्यप्रदेश राज्यातील लाडली बहना योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांचा हप्ता अडीचशे रुपयांनी वाढवण्यात आला आहे. खरंतर मध्य प्रदेश राज्यातील लाडक्या बहिणींना सुरुवातीच्या टप्प्यात एक हजार रुपये दिले जात होते. पण सध्या एमपी मधील लाडक्या बहिणींना 1250 रुपये दिले जात आहेत. महत्त्वाची बाब अशी की आता पुन्हा एकदा मध्यप्रदेश राज्यातील लाडक्या बहिणींचा हप्ता अडीचशे रुपयांनी वाढवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
म्हणजेच मध्य प्रदेश राज्यातील लाडक्या बहिणींचा हप्ता आता पंधराशे रुपयांचा होणार आहे आणि याचा लाभ रक्षाबंधनापासून लाडक्या बहिणींना मिळेल अशी मोठी घोषणा मध्य प्रदेश राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
मध्य प्रदेश राज्यातील लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ता दिला जाईल अशी घोषणा तेथील सरकारने केली आहे. दरम्यान आता याच अनुषंगाने एमपी सरकारकडून तेथील लाडक्या बहिणींचा आता अडीचशे रुपयांनी वाढवण्यात आला असून 2028 पर्यंत लाडक्या बहिणींना 3000 रुपये प्रति महिना लाभ दिला जाईल असा दावा मध्य प्रदेश राज्य शासनाकडून केला जातोय.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati