एक मोठी अपडेट समोर आली आहे. जून महिना संपायला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत देण्यात येणारा जून महिन्याचा १५०० रुपये चा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नाही. आता सांगण्यात येत आहे की, महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जातील. जून आणि जुलै महिन्याचा हफ्ता एकदम मिळेल. या बद्दल सविस्तर जाणून घ्या.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. म्हणजेच वर्षाला महिलांच्या खात्यात १८००० रुपये जमा करण्यात येतात. गेल्या वर्ष भर महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकूण ११ हफ्ते देण्यात आले आहे. या योजनेचा पहिला हफ्ता जुलै २०२४ मध्ये मिळाला होता. आता महिलांना लवकरच १२वा आणि १३वा हफ्ता एकदाच मिळेल.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 या कालावधीमधील हफ्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले. मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. आता जून महिन्यास संपण्यास अवघे सहा-सात दिवस बाकी आहेत यामुळे जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा सुद्धा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जातोय. दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना जून महिन्याची प्रतीक्षा आहे. मात्र अजून सरकारकडून या संदर्भात कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही.
जून महिना संपण्यास आता फक्त सहा ते सात दिवस बाकी आहेत आणि असे असतानाही जून महिन्याच्या हफ्त्याबाबत सरकारकडून कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही, यामुळे जून आणि जुलै या दोन महिन्यांचे हप्ते सोबतच दिले जाऊ शकतात आणि हे दोन्ही हप्ते पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये खात्यात जमा होतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत मुलींना भविष्यात तब्बल ६५ लाख रुपये मिळतील !
महत्त्वाची बाब म्हणजे असे घडले तर यात नवल वाटण्यासारखे काहीही नाही, कारण की या योजनेच्या माध्यमातून पूर्वीदेखील अशा पद्धतीने दोन महिन्यांचे पैसे सोबत देण्यात आले आहेत. यामुळे जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे म्हणजेच बारावा आणि तेरावा हफ्ता जुलै महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पण या संदर्भात अजून तरी अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे खरंच या योजनेचे दोन्ही हफ्त्याचे पैसे जुलै महिन्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
👉लाडकी बहीण हफ्ता मिळणाऱ्या लाभार्थ्यांची यादी
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

