पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे . गृहविभागाने राज्यातील १५ हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरतीची घोषणा केल्यामुळे पोलीस दलात लालचाली सुरु झाल्या आहेत. गृहमंत्रालयाने सुमारे १५ हजार रिक्त पदावर पोलीस भरतीची घोषणा केली आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलीस दलात १७२ पदांसाठी भरती ची अपेक्षा आहे. लवकरच भरतीप्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र पोलिस दलातील विविध घटकांतील १३ हजार ५६० पदांच्या भरती प्रक्रियेत ग्रामीण दलातील रिक्त जागांचाही समावेश आहे. सन २०२३ मध्ये नाशिक ग्रामीण पोलिस दलात दीडशे जागांवर भरती प्रक्रियेतून उमेदवारांची नियुक्ती झाली. तर सन २०२४ मध्ये ३२ जागांवर भरती झाली. सहा वर्षानंतर २०२३ मध्ये भरती झाल्याने उमेदवारांमध्ये उत्साह जाणवला होता, तर नाशिक शहरात तब्बल आठ वर्षानंतर सन २०२४ मध्ये ११८ पदांवर भरती झाली. त्या भरतीतून नियुक्त झालेले कर्मचारी सध्या पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत.
गृह मंत्रालयाने राज्यात सुमारे १५ हजार रिक्त पदांवर पोलिस भरतीची घोषणा केल्यानंतर सर्व पोलिस घटकांत भरती प्रक्रियेसंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. नाशिक शहरात रिक्त पदे शिल्लक नसली, तरी ग्रामीण पोलिस दलात १७२ रिक्त पदांवर भरतीची शक्यता आहे. सिंहस्थापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास नवप्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे ‘बळ’ प्राप्त होणार आहे. त्यामुळे अर्ज नोंदणीकडे उमेदवारांचे लक्ष असून, बारावीपासून विविध विद्याशाखेतील उच्च पदवीधरांनी त्याकरिता तयारी सुरू केली आहे.
पोलीस भरतीत रिक्त पदांचा तपशील :
पोलिस शिपाई – १० ,९०८
पोलिस वाहन चालक – २३४
एकूण ११.१६७
पुढील टप्प्यात शहरात भरती होणार नसली, तरी आंतरजिल्हा नियुक्तीतून रिक्त पदे भरली जाण्याची शक्यता आहे. तर ग्रामीण पोलिसांच्या रिक्त मनुष्यबळात दीडशे पोलिस अंमलदार आणि २२ वाहन चालक या पदांचा समावेश असेल. त्यामुळे कित्येक वर्षांपासून ‘खाकी’ चे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. सिंहस्थापूर्वी भरतीची शक्यता असल्याने उमेदवारांची जोरदार तयारी केल्याचे दिसते. दरम्यान, अर्ज नोंदणीची घोषणा अद्याप झालेली नाही.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE