JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SCI शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरती!

SCI शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरती!

SCI Mumbai Recruitment 2024 :

SCI म्हणजेच शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती सुरू आहे. या भरतीतून रेडिओ ऑपरेटर आणि टेक्निकल असिस्टंट या पदांच्या चार रिक्त जागा भरल्या जातील. या भरतीतून बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराला देखील नोकरीची संधी मिळेल. तसेच दर महिना ७२,०००/- इतके वेतन मिळेल. यासाठीची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडेल त्यासाठी दिनांक २२ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख असेल.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई येथे विविध रिक्त पदे उपलब्ध आहेत. हीच रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे चार रिक्त जागा आहेत निवृत्ती जागा रेडिओ ऑपरेटर आणि टेक्निकल असिस्टंट या दोन पदांमध्ये विभागलेल्या आहेत.

SCI Bharti 2024

पद आणि त्यानुसार उपलब्ध जागा

रेडिओ ऑपरेटर – २ रिक्त जागा

टेक्निकल असिस्टंट – २ रिक्त जागा

पदानुसार अपेक्षित शैक्षणिक पात्रता

  • रेडिओ ऑपरेटर
  • उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • GMDSS इक्विपमेंट्स हाताळण्यासाठी उमेदवाराकडे जनरल ऑपरेटर सर्टिफिकेट (GOC) असणे आवश्यक.
  • तत्सम कामातील एक वर्षाचा अनुभव असणे अपेक्षित.
  • उमेदवाराला संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बरोबर टेक्निकल असिस्टंट किंवा रेडिओ ऑपरेटर म्हणून रुजू झाल्यानंतर मुंबई हे नोकरीचे ठिकाण असेल. या दोन्ही पदांवर होणारी नियुक्ती ही कंत्राटी पद्धतीने असणार आहे. हे नियुक्ती दोन वर्षांसाठी असेल. आवश्यकतेनुसार आणि उमेदवाराच्या परफॉर्मन्सवर आधारित हे कंत्राट पुढे सहा सहा महिने असे दोन वेळेला वाढवले जाऊ शकते. टेक्निकल असिस्टंट किंवा रेडिओ ऑपरेटर या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने त्यांचा अर्ज सादर करू शकतात. अर्ज जमा करण्यासाठी दिनांक २२ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख नेमून देण्यात आली आहे.

द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे सुरू असलेल्या इतर रिक्रुटमेंट बद्दल, इंटर्नशिप बद्दल आणि इतर उपक्रमा बद्दलची अधिक माहिती https://www.shipindia.com/frontcontroller/shore या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर वाचता येईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *