वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मोठी बातमी ! TET पात्र शिक्षकांचीच होणार पदोन्नती ! जाणून घ्या सविस्तर

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ; ज्या शिक्षकांनी TET परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्यांनाच पदोन्नती मिळणार . असा निर्णय समोर आलेला आहे. या बद्दल सविस्तर जाणून घ्या.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

TET Promotion News 2026

जुन्या नियमांनुसार पदोन्नती प्रक्रिया राबवायची की नव्या नियमानुसार याविषयी खल सुरू आहे. शिक्षकांच्या संघटनांनीही त्यात उडी घेतल्याने या प्रक्रियेला उशीर होत होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच गुरुजींना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.

न्यायालयीन प्रक्रियेमुळे समूह साधन केंद्र समन्वयक, विस्ताराधिकारी, मुख्याध्यापक, पदवीधर यांच्या पदोन्नती रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबर २०२५ च्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे समजते. शिक्षकांमध्ये मात्र गट-तट झाल्याचे चित्र आहे. सेवाज्येष्ठ शिक्षकांना टीईटी नसतानाही पदोन्नती मिळावी, त्यासाठी दोन वर्षांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
अवर सचिवांनी १९ जानेवारी २०२६ रोजीच्या एका पत्राद्वारे सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना स्पष्ट निर्देश दिले आहेत.

शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक, विस्ताराधिकारी शिक्षण या पदावर तूर्तास पदोन्नती देता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिलेत. त्यांनी त्या पत्रात ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण या अटीबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केली आहे. केवळ असेच शिक्षक पदोन्नती पात्र आहेत, असेही नमूद केले आहे.

शिक्षण संचालकांनीही ९ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रात सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, सर्व प्रशासनाधिकारी, महानगरपालिका शिक्षण निरीक्षक दक्षिण पश्चिम उत्तर बृहन्मुंबई, या सर्वांना दिलेल्या पत्रात शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अर्हता धारण केली आहे, केवळ असे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत, असे कळवले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी दिला आहे. ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी राहिली असेल, त्यांनाही टीईटीमधून वगळले आहे. परंतु हा निर्णय देत असताना पदोन्नतीसाठी मात्र सर्व शिक्षकांना टीईटी पदवी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे.

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Maharashtra Professor Recruitment 2026

खुशखबर ! महाराष्ट्रात ५५०६ प्राध्यापक पदासाठी होणार मेगा भरती ! सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र सरकारने ५५०६ प्राध्यापक पदांच्या भारतीप्रक्रियेला मान्यता दिलेली आहे. तरुणांसाठी ही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *