मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे . लवकरच मुंबईत नवीन वॉटर मेट्रो धावणार , म्हणजेच मुंबईत वॉटर मेट्रो हा नवीन प्रकल्प सुरु होणार आहे. मुंबई वॉटर मेट्रो हा प्रकल्प केवळ वाहतुकीचा नव्हे , तर शहराच्या गतिशीलतेचा नवा अध्याय आहे. नागरिकांच्या विकासाच्या दृष्टीने , पर्यावरणपूरक आणि वेगवान वाहतूक पद्धतीकडे टाकलेले हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. मुंबईकरांसाठी हा बदल त्याच्या जीवनात सुलभता घेऊन येणार , या बद्दल अधिक माहिती जाणून घ्या .
मुंबईची वाहतूक समस्या दिवसेंदिवस फार गंभीर होत चालली आहे. वाढती लोकसंख्या , रस्त्यावरील कोंडी आणि सार्वजनिक वाहतुकीवरील ताण यामुळे नागरिकांसाठी पर्यायी आणि वेगवान प्रवासाच्या मार्गाची गरज निर्माण झाली आहे . या गरजेसाठी वॉटर मेट्रो प्रकल्पाचे नियोजन सुरु करण्यात आले आहे , या प्रकल्पामुळे वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणू शकतो.

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी पुढाकार घेतला असून, यासाठी तीन महिन्यांत अंतिम आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोची मेट्रो रेल लिमिटेडकडे या प्रकल्पाच्या प्रारंभिक पाहणीचे काम सोपवण्यात आले होते. त्यांच्या अहवालावर आधारित सादरीकरण नुकतेच मंत्रालयात झाले आणि त्यावर सकारात्मक चर्चा पार पडली. मुंबई वॉटर मेट्रोसाठी एकूण २९ टर्मिनल्स उभारण्यात येणार आहेत.
यासाठी १० महत्त्वाच्या जलमार्गांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये पुढे वाढ करण्याचाही विचार आहे. हे मार्ग उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, नवी मुंबई, वर्सोवा, वरळी आणि बांद्रा यांसारख्या प्रमुख भागांना जोडणार आहेत. त्यामुळे मुंबईतील विविध भागांतून जलमार्गाने सहज आणि वेळेची बचत करत प्रवास शक्य होणार आहे.
प्रवासाचा अनुभव प्रत्येक जेटी टर्मिनलवर प्रवाशांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. बोट्स खरेदी, प्रवासी प्रतीक्षालय, तिकीट व्यवस्थापन, आणि जलद चढ-उतर यांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. या प्रकल्पावर सुमारे २५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
वॉटर मेट्रोमुळे मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. रस्ते आणि रेल्वेवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांना गर्दीपासून मुक्त आणि शांत जलमार्गाचा अनुभव घेता येणार आहे. विशेषतः कार्यालयीन वेळेत होणारी वाहतूक कोंडी यामुळे मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

