वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MPSC तर्फे नवीन पदभरती जाहीर; या पदांसाठी करता येणार अर्ज @ mpsc.gov.in

MPSC – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. पदानुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची तारीख १ मार्च २०२४ आहे. शेवटची तारीख २१ मार्च २०२४ आहे. सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ अशा ३९ पदांसाठी जाहिरात आली आहे.

राज्यभर मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको, अशीही ओरड होत आहे. यातच पुन्हा अनुसूचित जाती, जमातीचे हक्काचे आरक्षण नाकारले जात असल्याचा आरोप होत होता. एमपीएससीकडून जाहिरात क्रं. ११४/२०२३ अन्वये सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक गट-अ करिता २१४ पदांच्या भरती संदर्भात जाहिरात देण्यात आली. या जाहिरातीत पात्रतेकरिता पदव्युत्तर शिक्षण ५५ टक्के अशी अर्हता होती. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग तसेच दिव्यांगांना देण्यात येणारी ५ टक्के सवलत संदर्भात कोणतीही सूचना नव्हती. आरक्षणाच्या नियमानुसार अनुसूचित जाती, जमातीच्या उमेदवारांना ५ टक्के सवलत म्हणजे ५० टक्के गुणांची मर्यादा दिली जाते. मात्र, आयोगाकडून कुठलेही स्पष्टीकरण न देता सरळ आरक्षणाचा नियमच डावलण्यात आल्याने आरक्षित घटकातील उमेदवारांना ऑनलाईन अर्जास मुकावे लागले होते. लोकसत्ताने हा विषय लावून धरल्यावर ५ टक्के आरक्षणाची सवलत लागू केली.

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : ०१मार्च २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ मार्च २०२४
  • अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/

About MahaBharti MP Jobs

Check Also

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली – १८ प्रशिक्षणार्थी लिपिक पदभरती सुरु ; अर्ज करा !

Sangli Urban Bank TC Recruitment 2025 - Sangli Urban Co-operative Bank Ltd., Sangli (Scheduled Co-operative Bank) invites......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *