A major recruitment drive for various posts under the Indian Coast Guard is underway. This is a golden opportunity for young people to secure a government job. Applications for this recruitment must be submitted online. The application process for the Indian Coast Guard Recruitment 2026 begins on October 6, 2026. Applications should be submitted via the official website. Click the link below for further information.
भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांची भरती सुरु ही एक मोठी भरती आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्ण संधी आहे. या भरती अंतर्गत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Indian Coast Guard Bharti 2026 अर्ज प्रक्रिया ६ ऑक्टोबर २०२६ पासून सुरु होणार आहे. अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करायचा आहे. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

संरक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या देशभरातील तरुणांसाठी भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) एक खूशखबर समोर आली आहे. भारतीय तटरक्षक दलाने नाविक (Navik) आणि यांत्रिक (Yantrik) विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.यावेळेस तटरक्षक दलाने उमेदवारांच्या सोयीसाठी आणि प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी अर्ज प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. पूर्ववत तटरक्षक दलाच्या संकेतस्थळावरून होणारी अर्ज प्रक्रिया आता थेट कर्मचारी निवड आयोगाच्या (Staff Selection Commission – SSC) अधिकृत वेबसाइटवरून राबवली जाणार आहे.
भरती प्रक्रियेची महत्त्वाची वैशिष्ट्ये:
ऑनलाइन अर्जाची मुदत: अर्ज प्रक्रिया ६ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होत आहे.
अर्ज करण्याची पद्धत: इच्छुक उमेदवारांना एसएससीच्या (SSC) अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल.एकत्रित बॅच (Double Intake): विभागाने ०१/२०२७ आणि ०२/२०२७ या दोन वेगवेगळ्या बॅच एकत्र भरण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे रिक्त जागांची संख्या मोठी असणार असून जास्तीत जास्त युवकांना संधी मिळणार आहे.
पदनिहाय शैक्षणिक पात्रता:
१. नाविक – डोमेस्टिक ब्रँच (Navik – DB):मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून किमान १० वी (SSLC) उत्तीर्ण असावे.
२. नाविक – जनरल ड्युटी (Navik – GD):गणित (Mathematics) आणि भौतिकशास्त्र (Physics) या विषयांसह १२ वी (10+2) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
३. यांत्रिक (Yantrik):१० वी उत्तीर्ण, सोबत इलेक्ट्रिकल (Electrical), मेकॅनिकल (Mechanical), किंवा इलेक्ट्रॉनिक्स (Electronics/Telecommunication) या शाखेतील ३ किंवा ४ वर्षांचा डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त ITI पदवी/प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि भारतीय तटरक्षक दलात सामील होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत SSC च्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati