JOIN Telegram
Thursday , 15 May 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर येथे पदभरती सुरु, अनेक पदांसाठी नोकरीची संधी!

शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर हि एक नावाजलेली संस्था आहे. या ठिकाणी नोकरी मिळणे म्हणजे एक छान प्रतिष्ठेचे चिन्ह आहे. याच शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूरकडून इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी नवींन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ही भरती “प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, स्टोअर कीपर, सुतार, वेल्डर, टर्नर” या पदांसाठी करण्यात येत आहे.  हि या मंडळात नोकरीची सुवर्णसंधीच आहे. निवड प्रक्रिया सरळ मुलाखती द्वारे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 18 मे 2025 रोजी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. तसेच इतर पूर्ण माहिती साठी SPM सोलापूर भरती 2025 बाबत अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरातीचा काळजीपूर्वक संदर्भ घ्यावा. 

SPM Solapur Bharti 2025

 

Shikshan Prasarak Mandal Solapur Job Vacancies – हि भरती प्रक्रिया टिचिंग आणि नॉन टिचिंग दोन्ही प्रकारच्या स्टाफ साठी आहे. या अंतर्गत अनेक महत्वाची पदे भरण्यात येत आहे. तसेच या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क सुद्धा आकारण्यात येणार नाही. आपल्याला आपल्या सर्व डाक्युमेंट्स सोबत सरळ मुलाखतीस हजर व्हायचे आहे.  हि मुलाखत १८ मे २०२५ रोजी सकाळी १०  वाजल्यापासून आयोजि केली जाणार आहे. उमेदवारांनी सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्र सोबत ठेवावे.

  • पदाचे नाव – व्याख्याता, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, स्टोअर कीपर, सुतार, वेल्डर, टर्नर 
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता विविध पदांच्या पात्रतेनुसार आहे.(आपण मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – सोलापूर आहे
  • अर्ज पद्धती – सरळ मुलाखाती द्वारे
  • मुलाखतीचा पत्ता – एस. पी. एम. पॉलिटेक्निक, कुमठे विमानतळाजवळ, होतागी रोड, सोलापूर-४१३२२४
  • मुलाखतीची तारीख – १८ मे २०२५ सकाळी १० .००  पासून 

वर्षानुवर्षे शिक्षण प्रसारक मंडळाने शैक्षणिक क्षेत्रात एक उत्कृष्ट आणि आदर्श नाव म्हणून प्रतिष्ठा मिळवलेली आहे. कै. ब्रह्मदेव दादा माने यांनी 1967 साली कुमठे या  गावात शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने केली. दादांच्या दूरदृष्टीमुळेच कुमठे गावात केजी ते कनिष्ठ महाविद्यालय तसेच पॉलिटेक्निक संस्था यांची स्थापना झाली आहे. याच संस्थेची हि भरती जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

पूर्ण जाहिराती लिंक 

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About MahaBharti MP Jobs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *