वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

भारतीय सैन्यात १०वी ,१२वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या ! Indian Army Recruitment 2026

Good news! A major job opportunity in the Indian Army awaits candidates who have passed the 10th and 12th-grade examinations; a total of 353 vacancies are to be filled through this recruitment drive. Interested candidates should check the detailed information

खुशखबर ! १०वी आणि १२वी उत्तीर्ण उमेदवारांना भारतीय सैन्यात नोकरीची मोठी संधी ; या भरतीअंतर्गत एकूण ३५३ रिक्त पदांची भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहिती जाणून घ्या. आणि ऑनलाईन पद्धतीने २८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात.    

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

Indian Army Bharti 2026

आसाम रायफल्समध्ये सहभागी होऊन देशसेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. आसाम रायफल्सने टेक्निकल आणि ट्रेड्समन रॅली भरती २०२६ साठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत विविध तांत्रिक आणि ट्रेड्समन पदांवर एकूण ३५३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. विशेष बाब म्हणजे दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांनाही या भरतीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असू शकते.

या भरतीत वॉरंट ऑफिसर (सायफर) या पदासाठी १२४, रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल) ३२, रायफलमन (लाइनमन फील्ड) २१, रायफलमन (आर्मरर) २९, रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक) १०, रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक) १३, रायफलमन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल) २२, हवालदार (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) ६, रायफलमन (मेटलस्मिथ) १९, रायफलमन (अपहोल्स्टर) ३, रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल १६, रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक) २३, रायफलमन (वेल्डर) २, वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन) २, वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन) १, वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट) २ आणि रायफलमन (मेसन) २९ जागा समाविष्ट आहेत. पदनिहाय शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. बहुतांश रायफलमन पदांसाठी दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय किंवा तांत्रिक प्रशिक्षण आवश्यक आहे.

काही पदांसाठी डिप्लोमा किंवा विशेष तांत्रिक पात्रता मागितली आहे. वॉरंट ऑफिसर (सायफर) पदासाठी बारावीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयांसह आयटीआय किंवा संबंधित पदवीची गरज आहे. ड्राफ्ट्समन पदासाठी बारावी उत्तीर्ण आणि आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा आवश्यक आहे. ऑपरेशन थिएटर टेक्निशियन आणि फिजिओथेरपिस्ट पदांसाठी बारावीसोबत संबंधित डिप्लोमा आणि अनुभव अट आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःच्या पदाची पात्रता काळजीपूर्वक तपासावी.

वयाची गणना १ जुलै २०२६ रोजी केली जाईल. वॉरंट ऑफिसर पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे आणि इतर पदांसाठी १८ ते २३ वर्षे आहे. अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना पाच वर्षे तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना तीन वर्षांची शिथिलता मिळेल. सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क शंभर रुपये असून अनुसूचित जाती-जमाती, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना शुल्क सूट देण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २८ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होईल आणि अंतिम तारीख २८ ऑक्टोबर २०२६ आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह अधिकृत वेबसाइटवर वेळेवर अर्ज करावा. ही भरती देशसेवेची उत्तम संधी असल्याने पात्र तरुणांनी संधी साधावी

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

e-KYC is compulsary for teacher and teachers staff

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य नाहीतर वेतन थांबवले जातील ! Completing e-KYC is mandatory for teaching and non-teaching staff.

The deadline for completing the e-KYC process for teaching and non-teaching staff in aided, partially …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *