JOIN Telegram

Thursday , 3 July 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Recent Posts

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !! Neet PG Exam 2025 15 जून रोजी होणारी परीक्षा स्थगित ! सविस्तर वाचा

NEET PG Exam 2025 Postponed supreme court decision

वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेबाबत मोठी बातमी आहे. (NEET PG Exam 2025) सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशानंतर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने (NBEMS) नीट परीक्षा पुढे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Read More »

आनंदाची बातमी !! SBI ज्युनियर असोसिएट मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला !

SBI Clerk Mains Result 2025

एसबीआय क्लर्क मेन्स परीक्षा १० व १२ एप्रिल रोजी पार पडली होती. तेव्हापासून उमेदवार निकालाची प्रतीक्षा करत होते, जी आता संपली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्युनियर असोसिएट (क्लर्क) पदासाठी घेण्यात आलेल्या मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर sbi.co.in वर ऑनलाईन स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवार तात्काळ आपला निकाल तपासू शकतात आणि स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात.

Read More »

बारामती नगरपरिषद मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु ; थेट मुलाखतीतून निवड ! जाणून घ्या सविस्तर

Baramati Nagarparishad Bharti 2025

बारामती नगरपरिषद शिक्षण मंडळामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी शिक्षक (पुरुष/महिला), दाई (महिला) आणि कला शिक्षक (पुरुष/महिला) अशा एकूण 26 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती मानधन तत्त्वावर 11 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात केली जाणार असून, उमेदवारांची नेमणूक बारामती नगरपरिषद शाळा क्र. 1 ते 8 मध्ये LKG, HKG आणि इयत्ता 1 ली ते 8 वी साठी केली जाईल.

Read More »

जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता ६ वी मध्ये प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया सुरु !

Jawahar Navodaya Vidyalaya Admission open 2025

जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता ६वीसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ या सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. नवोदय विद्यालय समितीने (NVS) ही प्रक्रिया सुरू केली असून इच्छुक विद्यार्थ्यांचे पालक २९ जुलै २०२५ पर्यंत अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Read More »

खुशखबर !! होम गार्ड पदांची भरती सुरु ; एकूण १६०० पदांची भरती ! आजच अर्ज करा

Recruitment for Home Guard 2025

खुशखबर ! आता होम गार्ड भरती सुरु होणार आहे . ही एक चांगली संधी आहे .तब्बल १६००हून  अधिक रिक्त पदांसाठी ही भरती आहे . या पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ८ वी , १० वी उत्तीर्ण पाहिजे. याभरतीसाठी अर्ज प्रक्रिया १५ जून २०२५ पासून सुरु होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख  ३० जून २०२५  आहे. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

Read More »

ICAI ने सप्टेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या CA परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले.

ICAI CA September Exam Date sheets realeased 2025

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने सप्टेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या सीए परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. या वेळापत्रकात फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल या तिन्ही अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. ICAI ने एक अधिकृत परिपत्रक जारी करून या परीक्षा तारखा जाहीर केल्या आहेत.

Read More »

मोठी आनंदाची बातमी !! दिल्ली विकास प्राधिकरणात मेगा भरती ; तब्बल १ हजार ३८३ रिक्त जागा ! चला तर मग त्वरित अर्ज करा

DDA Recruitment 2025

दिल्ली विकास प्राधिकरण (DDA ) विभागात  एकूण 1,383 रिक्त जागेसाठी विविध पदांची मेगा भरती सुरु ! १० उत्तीर्ण आणि ITI झालेले या भरती साठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी. अर्ज करण्यापूर्वी वेबसाईट वर दिलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती खाली दिलेली आहे . 

Read More »

केंद्रीय अप्रेंटिसशिप कौन्सिल द्वारे अप्रेंटिसशिपसाठी ३० टक्के जास्त स्टायपेंड मिळणार !

Apprentices will receive 30 percent higher stipend through the Central Apprenticeship Council

केंद्रीय अप्रेंटिसशिप कौन्सिलची (Central Apprenticeship Council – CAC) ३८ वी बैठक नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अप्रेंटिसशिपमधील गळती कमी करणे आणि अधिकाधिक उमेदवारांना आकर्षित करणे या हेतूने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Read More »

NEET PG बाबत सर्वोच्च न्यायालयाचा काय निर्णय ? जाणून घ्या

What is the supreme court decision about NEET PG 2025

NEET PG 2025 साठी तयारी करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा आयोजक संस्थेला NEET PG 2025 परीक्षा फक्त ‘एकाच शिफ्टमध्ये’ घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत, जेणेकरून परीक्षेतील पारदर्शकता टिकून राहील आणि सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल.

Read More »

10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून ‘ही’ विशेष सूट !

10th Grade student achieve opportunity who have passed

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी १०वीत 'बेसिक गणित' (Basic Mathematics) विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांना एक विशेष सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. या सूटीनुसार, अशा विद्यार्थ्यांना ११वीत गणित विषय घेण्याची परवानगी यंदाही मिळणार आहे. ही सूट मागील काही शैक्षणिक वर्षांपासून दिली जात असून या वर्षीही ती लागू राहणार आहे.

Read More »

एनडीएत ! श्रीती दक्ष कला शाखेत अव्वल

At NDA, Shriti Daksh is topper

भारतीय सशस्त्र दलासाठी आणि विशेषतः महिलांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून १७ महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीने पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्यासह ३०० हून अधिक पुरुष कॅडेट्स देखील एनडीएतून पदवीधर झाले आहेत.

Read More »

MPSC द्वारे गट -अ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू ! लवकरात लवकर अर्ज करा

MPSC Group C Recruitment 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-अ संवर्गातील विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती मोहिमेंतर्गत विविध विभागांमध्ये पदे भरली जाणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २ जून २०२५ पासून आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर mpsc.gov.in जाऊन अर्ज भरावेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २३ जून २०२५ आहे.

Read More »

माजी सैनिकांमार्फत विद्यार्थ्यांना थेट प्रशिक्षण मिळणार ! या बद्दल जाणून घ्या

Students recieve direct training from retired miltary officers

राज्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘आनंददायी शनिवार’ (Happy Saturday) हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत स्वयंसेवी पद्धतीने कार्य करणाऱ्या माजी सैनिकांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शिस्त, देशभक्ती, नेतृत्वगुण आणि समाजसेवेचे मूल्य थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार असून, राष्ट्रनिर्मितीकडे एक सशक्त पाऊल पडणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

Read More »

BEL अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनिअर पदांची भरती सुरु ! आजच अर्ज करा

BEL Bharti 2025

इंजिनिअर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! BEL मध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर व इतर पदांची भरती ; जर तुम्ही अभियांत्रिकी पदवीसह चांगल्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने प्रोजेक्ट इंजिनिअरसह विविध पदांसाठी भरतीसंदर्भात अधिसूचना जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांना ४ जून २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Read More »

नवीन अपडेट !! UPSC ची नवीन वेबसाईट सुरू !

UPSC New Website Launched 2025

UPSC ची नवीन वेबसाईट सुरू; आता आधारद्वारे नोंदणी शक्य ; संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. आयोगाने उमेदवारांसाठी नवीन संकेतस्थळ https://upsconline.nic.in सुरू केले आहे, ज्यावरून आता अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी होणार आहे. या नवीन पोर्टलच्या माध्यमातून आता आधार कार्डाच्या मदतीने नोंदणी करता येणार असून, ओळख पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

Read More »

MBA CET चा निकाल जाहीर झाला !

MBA CET Result Declared 2025

MBA CET 2025 निकाल जाहीर – ७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल, लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET CELL) मार्फत आयोजित MBA अभ्यासक्रमाच्या CET 2025 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली मध्ये नवीन 30 पदांची भरती जाहीर ! त्वरित अर्ज करा

NHM Gadchiroli Recruitment 2025

राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली (NHM) द्वारे विविध पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी एकूण ३० पदे रिक्त आहे.  संबंधित अधिक माहिती अधिकृत वेबसाइट वर दिलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ९ जून २०२५ पूर्वी सादर करावा . अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. pdf ची लिंक खाली दिलेली आहे . अधिक माहितीसाठी मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा .

Read More »

CBSE दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर !

CBSE Supplementary Exam DateSheets announced 2025

CBSE दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेपासून सुरू होईल अर्ज प्रक्रिया केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने यावर्षीच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या पुरवणी (कंपार्टमेंट) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थी 30 मे 2025 पासून अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर अर्ज करू शकतात. विलंब शुल्काशिवाय अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 आहे. ₹2000 विलंब शुल्कासह अर्ज 18 व 19 जून 2025 रोजी करता येतील.

Read More »

CISCE निकाल जाहीर झाला ! तपासून बघा

CISCE Result Declared 2025

भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद (CISCE) ने ICSE (इयत्ता 10वी) आणि ISC (इयत्ता 12वी) परीक्षांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता, ते आता अधिकृत वेबसाइट cisce.org वर जाऊन त्यांचे अद्यतनित गुण पाहू शकतात. याआधी, CISCE ने 30 एप्रिल 2025 रोजी या परीक्षांचे मूळ निकाल प्रसिद्ध केले होते.

Read More »

पुणे विद्यापीठ अंतर्गत पदवीधारकांसाठी रोजगार मेळावा आयोजित ! जाणून घ्या सविस्तर

Mega Job Fair organised in Pune University 2025

पुणे विद्यापीठ अंतर्गत पदवीधर तरुणांसाठी वाणिज्य विभागामार्फत एक रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे . हा रोजगार मेळावा ३  जून २०२५  ला आहे . यासाठी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा . विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी https://shorturl.at/zDnLU या लिंकवर जाऊन पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. पदवीधर तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे! ICA Edu Skills Pvt. Ltd. आणि …

Read More »

खुशखबर !! १०वी आणि १२वी च्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर !

10th ,12th supplementry exam Time table declared

१०वी आणि १२वी महाराष्ट्र राज्य बोर्ड चा निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात आला होता. त्यात काही विद्यार्थी कुठल्या विषयात अनुत्तीर्ण झाले होते. त्यासाठी  पुरवणी परीक्षा घेण्यात येते . दरवर्षी ही परीक्षा जुलै - ऑगस्ट मध्ये घेण्यात येते . पण यावर्षी ही परीक्षा जून - जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. त्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे . विद्यार्थ्यांनी ते खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट च्या लिंक वर क्लिक करून सविस्तर वेळापत्रक जाणून घ्या . 

Read More »

MPSC PSI 2023 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला !

MPSC PSI Exam 2023 Result Declared

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मार्फत २०२३ या वर्षी PSI पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे . तरी उमेदवारांनी आपला निकाल खाली दिलेल्या माहिती वरून नीट तपासून बघा . 

Read More »