वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राज्यात लवकरच शाळांमध्ये शिक्षकेतर भरती होणार !

The recruitment for non-teaching staff in schools across the state will begin soon : राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः, पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह 100 टक्के नामनिर्देशनाने भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली.

शिक्षक भरतीच्या धर्तीवर शिक्षकेतर पदांना रिक्त पदांच्या 80 टक्के पदभरतीची अट लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शिक्षकेतर पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. भरतीअंतर्गत 5 हजार पदांची भरती होणार आहे.

Non teaching staff recruitment 2025

शिक्षकेतर पदे रिक्त राहिल्याने ती कामे शिक्षकांना करावी लागतात. त्याचा अध्यापन, शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर, शिक्षकेतर संवर्गातील काही पदांच्या नियुक्तीचे प्रमाण सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. Open the way for recruitment 100 टक्के सरळ सेवेने भरतीकनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक या संवर्गात खासगी मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वारसास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याबाबत निश्चित केलेल्या या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे, ही पदे 100 टक्के सरळसेवेने भरताना त्यात अनुकंपा नियुक्तीच्या मार्गाचा समावेश आहे.

 

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

स्वा. स्व. श्री. शिवाजी नाथाजी पाटील ग्रा. बि. शेती सह. क्रे. संस्था मर्या., जि. कोल्हापूर – १० वी पास/इतर ; शिपाई/इतर पदांसाठी मुलाखत आयोजित

SP Patsanstha Recruitment 2025 - Freedomfighter Late Mr. Shivaji Nathaji Patil Gramin Bigar Sheti Sahakari Credit Sanstha......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *