वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

रोजगार मेळाव्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात ७१ हजार रोजगाराची संधी ! अधिक माहिती जाणून घ्या – 71,000 job opportunities in Maharashtra through job fairs!

There is good news for the youth of Maharashtra. A job fair is scheduled to be held on September 29, 2026, offering 71,000 employment opportunities. Major companies such as Tata Motors, Mahindra & Mahindra, and Godrej Enterprises Group will be providing job opportunities for young people at this event. Interested and eligible candidates are encouraged to find out more details.

महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. २९ सप्टेंबर २०२६ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या रोजगारमेळाव्यात तरुणांसाठी ७१००० रोजगाराची संधी उपलब्ध आहेत. 71,000 job opportunities in Maharashtra through job fairs या मेळाव्यात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा , गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप सारख्या मोठ्या कंपन्या तरुणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे. इच्छुक आणि पात्र तरुणांनी अधिक माहिती जाणून घ्या.   

Rojgar Melawa 29 september 2026

महाराष्ट्र राज्यातील युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी एक हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यांत २ हजार ५०० हून अधिक उद्योगसमूह सहभागी होणार असून ७१ हजार ९३९ प् रोजगार संधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप यांच्यासह अनेक नामांकित कंपन्या तरुणांना रोजगाराच्या संधी देणार आहेत. कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून उद्योगांच्या मनुष्यबळ गरजा आणि युवकांची कौशल्ये यांची सांगड घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या  महाकुंभासाठी आतापर्यंत १ हजार ५८८ कंपन्यांनी नोंदणी केली असून त्यांच्यामार्फत ७१ हजार ९३९ प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज, एलआयसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, बॉश, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट आणि सीएट यांसारख्या दिग्गज कंपन्या यात सहभागी आहेत. ऑटोमोबाईल, उत्पादन, बँकिंग, वित्तीय सेवा, आयटी, शिक्षण, आरोग्य आणि लॉजिस्टिक्स यासारख्या विविध क्षेत्रांतून संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी पास, आयटीआय, पदवी, डिप्लोमा, इंजिनीअरिंग तसेच इतर कौशल्याधारित पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी तंत्रज्ञ, मशीन चालक, फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक आणि इतर पदांवर नोकऱ्या उपलब्ध असतील. शासनाशी संबंधित संस्थांमध्येही काम करण्याची संधी युवकांना मिळणार आहे. २९ सप्टेंबर २०२६ पर्यंत नोंदणीकृत कंपन्यांची संख्या २ ५०० हून अधिक होण्याची अपेक्षा आहे.

तसेच आगामी काळात आणखी कंपन्या आणि उद्योगसंस्था सहभागी होणार असल्याने रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हा उपक्रम युवकांना रोजगार मिळवून देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

South Central Railway Recruitment 2026

आनंदाची बातमी! दक्षिण रेल्वे मध्ये ४४७१ पदांसाठी मोठी भरती ,पात्रता १० वी पास ; लगेच अर्ज करा ! South central Railway Recruitment 2026

There is good news for young candidates seeking government jobs. A new recruitment notification has …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *