JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IBPS लिपिक परीक्षेसाठी अ‍ॅडमिट कार्ड जारी, त्वरित करा डाऊनलोड !

IBPS लिपिक परीक्षेसाठी अ‍ॅडमिट कार्ड जारी, त्वरित करा डाऊनलोड !

Download  Admit Card for IBPS Clerk Exam :

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) द्वारे लिपिक म्हणजे क्लर्क परीक्षा आयोजित केली आहे.यासाठीच्या प्रिलिम्स परीक्षेसाठी अ‍ॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे. IBPS च्या भरतीप्रक्रियेद्वारे तब्बल 5800 जागांवर भरती केली जाणार आहे.

देशतील विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये लिपिक संवर्गाच्या रिक्त पदांवर थेट भरतीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) द्वारे लिपिक म्हणजे क्लर्क परीक्षा आयोजित केली आहे.यासाठीच्या प्रिलिम्स परीक्षेसाठी अ‍ॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे. ज्या उमेदवारानी अर्ज केला आहे ते IBPS च्या अधिकृत वेबसाईटवर अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करु शकतात. अ‍ॅडमिट कार्डमध्ये तुमचे नाव, परीक्षा क्रमांक, परीक्षा वेळ आणि दिनांक याचा समावेश असतो. डाऊनलोड केलेल्या अ‍ॅडमिट कार्डची प्रिंट ओळखपत्रासोबत परीक्षा केंद्रावर दाखवणे अनिवार्य आहे. ही या भरतीप्रक्रियेची प्रिलिम्स आहे. या भरतीप्रक्रियेद्वारे 5800 हून जास्त रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

IBPS प्रिलिम परीक्षेची तारीख

IBPS तर्फे आयोजित केलेल्या लिपिक भरतीप्रक्रियेची प्रिलिम्स परीक्षा 10 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ही परीक्षा 10 ऑगस्ट, 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट या दिवशी असणार आहे. या पदासाठीची पहिली परीक्षा आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. बॅंकेत काम करण्याची दृष्टीनेही महत्वाची परीक्षा आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी लाखो परीक्षार्थ्यांनी 22 जुलैपर्यंत अर्ज केले आहेत.उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की अ‍ॅडमिट कार्डवर जर परीक्षा अथवा तुमच्यासंबंधी कोणतीही माहिती चूकीची आढळल्यास तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करा.

IBPS RRB Clerk Admit Card 2024 डाऊनलोड प्रक्रिया

  • सर्वप्रथम, उमेदवाराला IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट द्यावी लागेल.
  • वेबसाइटवर, तुम्हाला “करिअर” किंवा “परिणाम” नावाचा विभाग सापडेल. त्यावर क्लिक करावे.
  • या विभागात IBPS RRB Clerk Admit Card ची लिंक मिळेल. त्यावर क्लिक करावे.
  • उमेदवाराला नोंदणी क्रमांक, पासवर्ड आणि इतर आवश्यक माहिती प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल.
  • सबमिट बटणावर क्लिक करा.
  • प्रवेश पत्र डाऊनलोड करा. डाऊन लोड केलेल्या प्रवेशपत्राची प्रिंटआऊट घ्या.

उमेदवारांना हा सल्ला देत आहोत की त्यांनी परीक्षेसाठी वेळे अगोदरच पोहचावे तसेच तुमच्यासोबत ओळखपत्र जसे की आर्धारकार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसंन्स इत्यादींपैकी एक ओळखपत्र सोबत ठेवावे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *