JOIN Telegram
Saturday , 19 April 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

RTMNU उन्हाळी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर !

RTMNU  exam time table 2025:  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी २०२५ परीक्षांचा प्रारंभ १७ मार्चपासून होणार आहे.

यासाठी सोमवारी विद्यापीठात विविध कॉलेजांचे प्राचार्य आणि केंद्रप्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आली. या परीक्षांचे आयोजन चार जिल्ह्यातील एकूण १२२ परीक्षा केंद्रांवर करण्यात येणार आहे. बैठक परीक्षा भवनातील मूल्यांकन कक्षात घेतली गेली.

RTMNU Exam Time Table 2025

यावेळी परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. संजय कविश्वर, उपकुलसचिव डॉ. नवीन मुंगळे, डॉ. मोतीराम तळस, साहाय्यक कुलसचिव नितीन कडबे आणि उमेश लोही यांची प्रमुख उपस्थिती होती. हिवाळी २०२४ परीक्षांचे परिणाम ३१ जानेवारीपूर्वी जाहीर केले गेले असून, अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकालही जाहीर करण्यात आले आहेत. उन्हाळी परीक्षा १७ मार्चपासून सुरू होऊन २५ मेपर्यंत मुख्य परीक्षा संपतील.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *