वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MBA CET चा निकाल जाहीर झाला !

MBA CET 2025 निकाल जाहीर – ७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल, लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET CELL) मार्फत आयोजित MBA अभ्यासक्रमाच्या CET 2025 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

यंदाच्या परीक्षेत सात विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल मिळवून उत्तुंग यश मिळवलं आहे. परीक्षेदरम्यान एकूण २८ प्रश्न चुकीचे आढळल्यामुळे, परीक्षार्थ्यांना प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी एक गुण देण्यात आला, अशा प्रकारे २८ अतिरिक्त गुण सर्व विद्यार्थ्यांना दिले गेले.

MBA CET Result Declared 2025

१०० पर्सेंटाइल मिळवणारे विद्यार्थी:

  • हर्षिता पांडे

  • प्रथम सिंह

  • प्रतीक म्हात्रे

  • मुजैद खान

  • आर्ची बिंदाल

  • लक्षिता चंडालिया

  • शाश्वी शाह

ही परीक्षा १ ते ३ एप्रिल २०२५ दरम्यान सहा सत्रांमध्ये घेण्यात आली होती. परीक्षेसाठी राज्यभरातून १,५७,२८१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी १,२९,१३१ विद्यार्थी उपस्थित, तर २८,१५० विद्यार्थी अनुपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या हरकती व तक्रारी:

परीक्षेनंतर २८ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत CET कक्षाने विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्याची संधी दिली होती. यामध्ये राज्यभरातून २५३ हरकती प्राप्त झाल्या.
त्यामध्ये:

  • १३४ तक्रारी – लॉजिकल रिझनिंग

  • २१ तक्रारी – अबस्ट्रॅक्ट रिझनिंग

  • ३५ तक्रारी – क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड

  • ३५ तक्रारी – व्हर्बल अ‍ॅबिलिटी

या तक्रारींची सखोल शहानिशा केल्यानंतर CET कक्षाच्या तज्ज्ञांनी २८ प्रश्न चुकीचे असल्याचे निष्कर्षात मांडले. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला २८ गुण अधिक देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता पुढील टप्प्यात MBA अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक CET CELL कडून लवकरच जाहीर होणार असून इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे भेट देणे आवश्यक आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

सुशगंगा पब्लिक स्कूल, वणी, जि. यवतमाळ – टीजीटी, पीजीटी आणि पूर्व प्राथमिक शिक्षक पदांसाठी मुलाखत आयोजित

SPS Wani Recruitment 2026 - Sushganga Public School, Wani, Dist. Yavatmal has arranged interview on date 15/4/2026 to fill up posts.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *