वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महाराष्ट्र FYJC मेरिट यादी 2025 Live पहिली मेरिट यादी आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार !

महाराष्ट्र FYJC मेरिट यादी 2025 Live पहिली मेरिट यादी आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंडळाकडून आज, ६ जून रोजी प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (FYJC) प्रवेशासाठीची पहिली तात्पुरती सर्वसाधारण मेरिट यादी जाहीर करण्यात येणार आहे. ही यादी mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

पहिल्या फेरीसाठीच्या नोंदणी प्रक्रियेची मुदत आज दुपारी १ वाजता संपणार असून, त्यानंतरच ही यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यादीद्वारे विद्यार्थ्यांना त्यांची प्राथमिक पात्रता समजेल आणि पुढील फेरीसाठीच्या तयारीसाठी दिशा मिळेल.

Maharashtra FYJC Merit List 2025 Declared today 1 PM

शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना आणि पालकांना वेळोवेळी mahafyjcadmissions.in संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून प्रवेश प्रक्रियेतील कोणतीही माहिती दुर्लक्षित राहणार नाही.

FYJC प्रवेश प्रक्रियेमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या विभागांतील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. यानंतर लवकरच प्रवेशाच्या पुढील टप्प्यांची घोषणा केली जाणार आहे.

 

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

DBSKKV RARS कर्जत – रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर १ पदावर नोकरीची संधी

DBSKKV RARS Karjat YP-I Job 2026 - Principal Investigator & Chief Agronomist, Regional Agri. Research Station, Karjat.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *