पोलीस भरती संबंधात नवीन बातमी समोर आली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील हजारो तरुणांच्या हाताला काम देण्याच्या हेतून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने महत्वाचे निर्णय घेतले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र्र पोलिस दलात १५ हजार पोलिसांची भरती करायला मंजुरी देण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला.
New news has come out regarding police recruitment. Police Bharti for 15 thousand posts 2025 Good news has come out for the youth preparing for police recruitment. The Maharashtra Cabinet has taken important decisions to provide work to thousands of youth in the state. The state cabinet meeting has approved the recruitment of 15 thousand policemen in the Maharashtra Police Force. The Home Ministry took this decision.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ हजार ५६० पोलिसांची रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी जून महिन्यात पोलीस महासंचालकांनी सुमारे १० हजार पोलिसांची भरती करण्याचे आणि १५ सप्टेंबरला मैदानी चाचणी होणार असल्याचे सांगितले होते.
मात्र, आता प्रत्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आणि खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत १५ हजार पदांना मंजूरी दिली आहे. त्यामुळे मागील काही महिन्यापासून पोलीस भरतीची वाट पाहाणाऱ्या तरूणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची रिक्त पदे भरण्याची घोषणा केली. मात्र, त्यानंतरही पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती.
त्यामुळे विद्यार्थी समन्वय समितीने काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. सप्टेंबरपूर्वी शासन निर्णय, अर्ज भरणे, अर्ज छाननी आणि परीक्षा घेणे अशक्य आहे, अशी मागणी विद्यार्थी समन्वय समितीने मागच्याच आठवड्यात केली होती. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मैदानी चाचणीसाठी अडचणी निर्माण होत आहेत.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE