Here is some good news for candidates aspiring to work in the banking sector. An advertisement has been published for the recruitment of 1,538 Clerk-level positions at SBI. The application process for this recruitment drive begins today, August 7, 2026, and the deadline to apply is August 27, 2026. Interested candidates can apply online by visiting the official website. Read on for detailed information regarding the recruitment.
बँकेत ज्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे त्या उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. SBI बँकेत लिपिक पदांची एकूण १५३८ रिक्त जागेच्या भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे. SBI Recruitment 2026 या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही आज ७ ऑगस्ट २०२६ पासून सुरु झालेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट २०२६ आहे. इच्छुक उमदेवार अधिकृत वेबसाईट वर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. भरती संबधीची अधिक माहिती सविस्तर जाणून घ्या.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
![]()
state bank of India स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत (SBI) देशभरात लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदांसाठी १५३८ रिक्त जागेची मोठी भरती जाहीर झाली आहे.या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती नुसार बँकिंग क्षेत्रात करिअर सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची संधी चालून आलेली आहे . प्रकाशित झालेल्या जाहिरातनुसार अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजे ७ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू झाली असून त्याची अर्ज प्रक्रियेची अंतिम मुदत २७ ऑगस्ट २०२६ पर्यंत राहणार आहे.
कनिष्ठ लिपिक पदासाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच यासाठी वयोमर्यादा २० ते २८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळू शकते. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा .
SBI भरती अंतर्गत अर्ज शुल्क हे सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५० रुपये आहे. एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी शुल्क माफ आहे. उमेदवारांना अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे .SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर क्लिक करून https://sbi.co.in/ अर्ज सादर करावे लागतील. ज्या उमेदवारांचे अर्ज मुदतीच्या नंतर आले तर ते अर्ज स्वीकारले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती समजून घ्याव्यात. तसेच अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. वेळेवर अर्ज करून ही सुवर्णसंधी साधावी . सविस्तर माहितीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर नियमित भेट द्यावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati