A golden opportunity for youth to secure a government job! A new recruitment advertisement has been published for various positions under the Khadi and Village Industries Commission (KVIC). These appointments will be on a contractual basis. Interested candidates can apply online for the KVIC recruitment until September 30, 2026. Please review the detailed information regarding the posts, number of vacancies, age limit, educational qualifications, and other relevant details
सरकारी नोकरीची तरुणांसाठी सुवर्ण संधी ! खादी आणि ग्रामोद्योग आयोग अंतर्गत विविध पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. या भरती अंतर्गत पदांची भरती कंत्राटी स्वरूपात होणार आहे. KVIC Bharti 2026 इच्छुक उमेदवार ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. पदांची माहिती, पदांची संख्या, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता इत्यादी विषयक माहिती सविस्तर माहिती जाणून घ्या.

केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) एकूण ५० विविध कंत्राटी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यंग प्रोफेशनल्स, कन्सल्टंट आणि सिनियर कन्सल्टंट या उच्च दर्जाच्या पदांचा यात समावेश असून, सरकारी व निमसरकारी क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या पदवीधर तरुण-तरुणींसाठी ही मोठी संधी ठरली आहे. योग्य पात्रता आणि अनुभव असलेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
या भरतीची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड पूर्णपणे शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे तयार होणाऱ्या शॉर्टलिस्ट, वैयक्तिक मुलाखत आणि मूळ कागदपत्रांच्या पडताळणीद्वारे होईल. त्यामुळे संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि चांगली शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांना थेट मुलाखतीच्या माध्यमातून आयोगात सामील होण्याची संधी उपलब्ध आहे.
या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ५० जागांपैकी २० पदे यंग प्रोफेशनल्ससाठी तर उर्वरित ३० पदे कन्सल्टंट व सिनियर कन्सल्टंट या श्रेणीसाठी निश्चित करण्यात आली आहेत. यंग प्रोफेशनल्समध्ये लेखा-लेखापरीक्षण, प्रशासन-मानवी संसाधन, खादी, कायदेशीर, प्रसिद्धी, विपणन, डिझाइन व विज्ञान-तंत्रज्ञान अशा विविध विभागांमध्ये जागा आहेत. कन्सल्टंट आणि सिनियर कन्सल्टंट पदांमध्येही लेखा, खादी कच्चा माल, प्रशासन, मालमत्ता-सेवा, विपणन व इतर विभागांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
अर्जदारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयात पदवी अथवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच संबंधित क्षेत्रात किमान पाच वर्षांचा व्यावसायिक अनुभव असणे बंधनकारक आहे. यंग प्रोफेशनलसाठी कमाल वय २७ वर्षे (१ ऑक्टोबर २०२६ रोजी), सिनियर कन्सल्टंटसाठी ३९ वर्षांखालील तर कन्सल्टंटसाठी ४० ते ६५ वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.
पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पदनिहाय अटी तपासून अर्ज करावा. ही भरती प्रक्रिया अनुभवी तरुणांना थेट केंद्रीय आयोगात सेवा देण्याची उत्तम संधी देत आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेवर अर्ज सादर करावेत.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati