वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

खुशखबर ! कॅनरा बँकेत ३५०० अप्रेंटिस पदांची मोठी भरती; पदवीधरांसाठी मोठी संधी ! त्वरित अर्ज करा – Canara Bank Bharti 2026

A new opportunity has arisen for graduates aspiring to work in the banking sector. Canara Bank has released a recruitment notification for 3,500 apprentice positions. Candidates are required to apply online for this recruitment, and the deadline for applications is October 17, 2026. Interested and eligible candidates can apply by visiting the bank’s official website. For more information, please visit www.canarabank.com.

जे उमेदवार पदवीधर आहेत आणि ज्यांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी नवीन संधी चालून आलेली आहे. कॅनरा बँकेत ३५००  अप्रेंटिस पदांची मोठ्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. Canara Bank Recruitment 2026 या भरती अंतर्गत उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे व अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर २०२६  ही आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकता.  www.canarabank.com या वेबसाइट वर क्लिक करून अधिक माहिती जाणून घ्या.  

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

Canara Bank Recruitment 2026

Canara Bank Recruitment 2026 : पदवीधरांसाठी कॅनरा बँकेने देशभरात एकूण ३५०० पदवीधर अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीअंतर्गत विविध राज्यांमध्ये स्थानिक भाषेच्या आधारावर जागा उपलब्ध आहेत.तसेच  उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. अधिकृत माहिती आणि अर्ज प्रक्रिया कॅनरा बँकेच्या www.canarabank.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे. क्लिक करून सविस्तर माहिती जाणून घ्या.

अप्रेंटिस या  पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून पदवी पूर्ण केलेली असावी. यासाठी वयोमर्यादा २३ ते ३६ वर्षे ठेवण्यात आली आहे. आणि अर्ज शुल्क सर्वसाधारण उमेदवारांसाठी ५०० रुपये असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना शुल्क माफ करण्यात आले आहे. तसेच इच्छुक उमेदवाराने निवड प्रक्रिया आणि इतर अटींसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, आणि मगच अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावा. असे बँकेने नमूद केले आहे , बँकेच्या सविस्तर अटी जाणून घ्या.

कॅनरा बँक भरती अंतर्गत रिक्त पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे तर मग जाणून घ्या राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशील पाहता कर्नाटकमध्ये सर्वाधिक ५८१ जागा आहेत, तर तामिळनाडूमध्ये ३९१, उत्तर प्रदेशात ४०९, आंध्र प्रदेशात २४७ आणि महाराष्ट्रात २०५ जागा उपलब्ध आहेत. केरळमध्ये २४०, पश्चिम बंगालमध्ये १५०, तेलंगणामध्ये १३४ आणि बिहारमध्ये १२२ जागा आहेत. दिल्ली, गुजरात, हरियाणा, ओडिशा, पंजाब, राजस्थान आदी राज्यांमध्येही लक्षणीय संख्येने जागा आहेत. प्रत्येक राज्यासाठी संबंधित स्थानिक भाषा ज्ञात असणे आवश्यक असल्याचे जाहिरातीत नमूद केले आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Post Graduate Course in Agriculture Admission 2026

कृषी पदव्युत्तर (PG) प्रवेशाची विशेष फेरी २१ सप्टेंबरपासून सुरू ! सविस्तर माहिती जाणून घ्या – Postgraduate course in agriculture Admission 2026

A center-wise centralized admission round for vacant seats in postgraduate agriculture and allied degree programs—offered …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *