वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नाशिक महापालिकेत २०४ रिक्त पदांची मेगा भरती सुरु ! Nashik Mahapalika Bharti 2026

Nashik Mahapalika Bharti 2026 : A significant opportunity has emerged for young job seekers at the Nashik Municipal Corporation. A temporary recruitment process—based on a fixed remuneration (honorarium) model—has been initiated to fill 204 vacancies across 18 different categories within the Public Health Department. Nashik Mahapalika Bharti 2026 These positions include Medical Officers, specialists in various medical fields, Staff Nurses, ANMs, technicians, and other related roles. Interested candidates may begin submitting their applications today, November 25, with the final deadline for submission being December 2, 2026.

नाशिक महानगरपालिकेत नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत एकूण १८ संवर्गांतील २०४ रिक्त जागांसाठी मानधन तत्त्वावर तात्पुरती भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात वैद्यकीय अधिकारी, विविध विषयांचे तज्ज्ञ डॉक्टर, स्टाफ नर्स, एएनएम, तंत्रज्ञ आणि इतर संबंधित पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना आज २५ नोव्हेंबरपासून अर्ज करता येणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  २ डिसेंबर २०२६ आहे. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

Nashik Mahapalika Bharti 2026

भरती प्रक्रियेत निवड झालेल्या शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, क्ष-किरण, बधिरीकरण, त्वचारोग आणि मानसोपचार तज्ज्ञांना दरमहा १ लाख १० हजार रुपये मानधन मिळणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी ७५ हजार ००० रुपये तर स्टाफ नर्स, एएनएम, मिश्रक आणि संगणक ऑपरेटर पदांसाठी २३ हजार ४५५ रुपये मासिक मानधन निश्चित करण्यात आले आहे. पदांची विभागणी पाहता स्टाफ नर्ससाठी ७९, एएनएमसाठी ५७, वैद्यकीय अधिकारी १५, मिश्रक १५, संगणक ऑपरेटर १० आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर व तंत्रज्ञांसाठी २८ जागा आहेत.

उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या अंतिम वर्षाच्या गुणांना ५० टक्के आणि मुलाखतीला ५० टक्के असे एकूण १०० गुणांच्या आधारे केली जाईल. निवड झालेल्यांची सुरुवातीची नियुक्ती सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असेल. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि प्रत्यक्ष स्वरूपात राबविण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://nmc.gov.in येथे जाऊन अर्ज भरावा. आवश्यक कागदपत्रांसह सार्वजनिक आरोग्य विभाग, तिसरा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

ICT मुंबई – रु. ३७,०००/- दरमहा वेतन ; कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) पदभरती जाहीर

ICT Mumbai MPVT JRF Job 2026 - Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till the last date......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *