वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मोठी भरती !! डॉ .पंजाबराव कृषी विद्यापीठात ५२९ पदांची भरती सुरु ! त्वरित करा अर्ज

Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ५० टक्के पदभरती प्रकल्पग्रस्तांमधून करण्यास राज्य शासनाने नुकतीच मंजूरी दिली आहे. यानंतर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गट ड संवर्गातील ५२९ रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांना या भरतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १० एप्रिल २०२५ आहे.

कृषी विद्यापीठांमध्ये गट-ड संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे प्रकल्पग्रस्त कुटुंबातील व्यक्तींमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासाठी ही विशेष भरती प्रक्रिया राबवली जाईल, जिथे प्रकल्पग्रस्तांची जमीन प्रत्यक्षात संपादित केली गेली आहे. यामध्ये प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या सदस्यांना सरळसेवेचा संधी दिली जाणार आहे.

Krishi Vidyapeeth Recruitment 2025

या भरती प्रक्रियेत विविध पदे भरण्यात येणार आहेत, ज्यात प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, चौकीदार, माळी, व्हॉलमन, मत्स्य सहायक आणि मजुर यांचा समावेश आहे. एकूण ५२९ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अर्ज करण्याची लिंक उपलब्ध असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १० एप्रिल २०२५ आहे.

रिक्त पदांची तपशीलवार माहिती:
प्रयोगशाळा परिचर: ३९ पदे, पात्रता – १०वी उत्तीर्ण.

परिचर: ८० पदे, पात्रता – माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण.

चौकीदार: ५० पदे, पात्रता – ७ वी उत्तीर्ण.

ग्रंथालय परिचर: ५ पदे, पात्रता – १० वी उत्तीर्ण.

माळी: ८ पदे, पात्रता – कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र.

मजुर: ३४४ पदे, पात्रता – ४ थी उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.

याशिवाय अन्य काही पदे देखील भरली जातील. उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षे असावे लागेल.

शुल्क:
खुला (अराखीव) प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ५०० रुपये अर्ज शुल्क.

मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक (EWS), अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी: २५० रुपये अर्ज शुल्क.

अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी उमेदवारांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देणे आवश्यक आहे.

 

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NHM जि. प. सातारा – ३४ वैदयकीय विशेषज्ञ पदभरती सुरु ; अर्ज करा !

NHM ZP Satara Specialist Recruitment 2026 - Chief Executive Officer, Distrit Council Satara invites Offline applications.......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *