वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

परीक्षा व मुलाखत न घेता मुंबई महानगरपालिकेत थेट ६१२ रिक्त जागेची भरती ! Mumbai Mahanagarpalika Bharti 2026

A new employment opportunity has opened up for young men and women at the Mumbai Municipal Corporation. Recruitment is underway for 612 vacant positions without the need for an examination or interview. The recruitment drive is scheduled for August 20, 2026, and August 21, 2026. Interested and eligible candidates are advised to review the detailed information. Please click the link below for further details.

मुंबई महानगरपालिकेत तरुण तरुणींसाठी रोजगाराची नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेत परीक्षा व मुलाखत न घेता थेट ६१२ रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे. Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 या भरतीसाठी तारीख २० ऑगस्ट २०२६ आणि २१ ऑगस्ट २०२६ ही आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सविस्तर माहिती जाणून घ्या. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2026

 

मुंबई आणि परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून उत्तीर्ण झालेल्या तरुण-तरुणींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार विभागाने ‘शिकाऊ उमेदवारांसाठी  विविध खात्यांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये एकूण ६१२ जागांसाठी मेगाभरती  जाहीर केली आहे. महानगरपालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर या प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली असून, पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी येत्या २० आणि २१ ऑगस्ट २०२६  रोजी भव्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेण्यात येणार नसून थेट दहावी आणि आयटीआय गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

हा मेळावा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. मेळावा सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), गोवंडी, एस.टी. वर्कशॉपजवळ, किरोळ रोड, विद्याविहार (पश्चिम), मुंबई-४०००८६ येथे होईल. गर्दी टाळण्यासाठी दोन दिवसांचे ट्रेडनुसार विभाजन केले आहे. २० ऑगस्टला २१६ पदे भरली जातील. त्यात डिझेल मेकॅनिक ८७, प्लंबर ६६, इलेक्ट्रिशियन ४०, रेफ्रिजरेशन व एअर कंडिशन मेकॅनिक ६, ड्राफ्ट्समन सिव्हिल ५, टर्नर ४, मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर ४, डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर ३ आणि मशिनिस्ट १ जागा आहेत.

२१ ऑगस्टला सर्वाधिक ३९६ जागांसाठी प्रक्रिया राबवली जाईल. कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंटच्या १५४ जागा सर्वाधिक आहेत. त्यासोबत फिटर ५८, मेकॅनिक मोटर व्हेईकल ३९, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक ३५, वायरमन ३३, मेसन-बिल्डिंग कन्स्ट्रक्शन २८, कारपेन्टर २०, वेल्डर १६ आणि पेंटर जनरल १३ पदे भरली जातील. निवड झालेल्या उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा असेल आणि शासनाच्या नियमांनुसार आकर्षक मासिक विद्यावेतन मिळेल.

सहभागी होण्यासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा. माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी विषयात किमान १०० गुणांसह उत्तीर्ण असणे आणि वय १४ वर्षांपेक्षा कमी नसणे अनिवार्य आहे. इच्छुकांनी मेळाव्याला जाण्यापूर्वी apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून ‘MCGM’ पर्याय निवडणे बंधनकारक आहे.

ही भरती मुंबईतील तरुणांसाठी कौशल्य विकासासोबत रोजगाराची मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांनी वेळेवर नोंदणी पूर्ण करून मेळाव्याला उपस्थित राहावे, जेणेकरून निवड प्रक्रिया सुरळीत पार पडेल आणि स्थानिक युवकांना महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये प्रशिक्षण मिळेल.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

बँक ऑफ बडोदा मध्ये मोठी भरती , एकूण २०६ विविध रिक्त पदे ; त्वरित अर्ज करा ! Bank of Baroda Bharti 2026

There is good news for young people aspiring to a government job in the banking …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *