वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आनंदाची बातमी ! रेल्वेत सहाय्यक लोको पायलट ९००० पदांची मेगाभरती ! आजच अर्ज करा

Railway recruitment of more than 9,000 posts of Assistant Loco Pilot begins : भारतीय रेल्वेतील नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) सहाय्यक लोको पायलट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, एकूण ९,९७० पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही अर्ज प्रक्रिया १० एप्रिल २०२५ पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ९ मे २०२५ आहे.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण केलेली असावी, तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, अभियांत्रिकी क्षेत्रातील डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवारही पात्र ठरतील.

Railway Recruitment for Assistant Loco pilot 9000 posts 2025

उमेदवारांचे वय १ जुलै २०२५ रोजी १८ ते ३० वर्षांदरम्यान असावे. मात्र, आरक्षणाच्या नियमांनुसार SC, ST, OBC आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.अर्ज करण्याची प्रक्रिया:
सर्वप्रथम, उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

त्यानंतर, संबंधित भरतीची लिंक निवडावी.

पुढे ‘नोंदणी’ (Registration) लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरून नोंदणी पूर्ण करावी.

नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करून फॉर्ममध्ये वैयक्तिक, शैक्षणिक व इतर तपशील भरावेत.

अर्ज शुल्क भरून अर्ज सादर करावा.

शेवटी, भरलेला अर्ज प्रिंट करून भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवावा.

ही भरती भारतातील विविध विभागीय रेल्वे क्षेत्रांमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे, जे उमेदवार रेल्वे क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघत आहेत, त्यांनी ही संधी नक्कीच साधावी.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

ICT मुंबई – रु. ३०,०००/- दरमहा वेतन ; संशोधन सहयोगी (RA) पदावर नोकरीची संधी

ICT RA Job 2025 - Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till the last date 10/11/2025 for the.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *