JOIN Telegram
Saturday , 19 April 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अंगणवाडी व मदतनीस यांच्या भरतीप्रक्रिया रखडल्या !

The recruitment process for Anganwadi workers and helpers has been delayed :अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांच्या नियुक्त्या आक्षेपांमुळे रखडल्या जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती प्रक्रियेत निवड झाल्यानंतरही काही पदांच्या नियुक्त्या आक्षेपांमुळे लांबणीवर पडल्या आहेत.

भरती प्रक्रियेत सहभागी काही उमेदवारांनी विविध प्रकल्पस्तरावर आक्षेप नोंदवल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. आता या आक्षेपांची चौकशी करून सुनावणी घेतली जाणार असून, त्यानंतरच अंतिम नियुक्त्यांचा मार्ग मोकळा होईल.

Anganwadi bharti delayed

दरम्यान, जिल्ह्यातील २५२ अंगणवाडी सेविका व मदतनीसांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात २,५९२ अंगणवाडी केंद्रे असून त्यामध्ये २,४७८ सेविका व २,४०९ मदतनीस कार्यरत आहेत. मात्र, अजूनही ११४ सेविका व १८३ मदतनीस पदे रिक्त आहेत.

या रिक्त पदांसाठी शासनाच्या मंजुरीनंतर गत महिन्यात महिला व बालकल्याण विभागाने प्रकल्पस्तरावर भरती प्रक्रिया राबवली. एकूण २९७ पदांसाठी ही भरती झाली होती. यामधून निवड झालेल्या २२ अंगणवाडी सेविका आणि २३ मदतनीस पदांवर आक्षेप नोंदवले गेले आहेत.

आक्षेप असलेली पदसंख्या (प्रकल्पनिहाय):

अंगणवाडी सेविका – २२ पदे

वरुड : २

अमरावती : ५

दर्यापूर : २

धामणगाव रेल्वे : ३

भातकुली : ५

नांदगाव खंडेश्वर : १

चिखलदरा : २

धारणी : २

मदतनीस – २३ पदे

अमरावती : १५

दर्यापूर : ५

मोर्शी : २

चांदूर रेल्वे : १

या प्रक्रियेत निवड झालेल्या उर्वरित ९२ अंगणवाडी सेविका व १६० मदतनीसांना नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली आहेत.

शासन स्तरावर चौकशी पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित ४५ पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात येणार आहेत.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *