वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महत्वाची बातमी ! लाडकी बहीण योजनेचा जूनचा हफ्ता फक्त या महिलांसाठी जाहीर ! वाचा सविस्तर

अत्यंत महत्वाची बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी समोर आलेली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार लवकरच महिलांना २० जून पर्यंत १२ वा हफ्ता मिळण्याचा लाभ दिला जाणार असून परंतु हाच जून चा हफ्ता कोणत्या महिलांना मिळणार व कोणत्या महिलांना नाही मिळणार याची यादी आली आहे. तुम्हीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दिलेली माहिती सविस्तर वाचा , या संदर्भातली अधिक माहिती खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील शिंदे सरकारने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेला सुरु करून एक वर्ष पूर्ण झालेले आहे . या योजने बद्दल एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे. आता फक्त योजनेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकरने महिलांचे अर्ज बाद केले असून त्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. आता या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार हे बघू .

Importanat update Ladki Bahin Yojana June Installment

योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना दिला जातो ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्त्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे. अशाच महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो.

ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही.  इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना याचा लाभ दिला जात नाही . सरकारी कर्मचारी असणाऱ्या अथवा सरकारी कर्मचारी असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळत नाही.

योजनेच्या अटींचे पालन न करणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे. समोर आलेल्या माहिती नुसार अडीच हजार महिलांना सरकारी कर्मचारी असूनही लाभ घेत असल्या कारणाने या योजनेतून बाद करण्यात आले आहे.

सरकारने महिलांना आवाहन केले आहे की , अशा अपात्र लाभार्थींनी आपले अर्ज मागे घ्यावे नाहीतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

जून महिन्याचा हफ्ता वाटप कधी सुरु होणार

मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेच्या बाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या वर्षी सुरू झाली असून या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत जुलै 2024 पासून प्रत्यक्षात लाभ मिळतोय.

आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 2025 या कालावधीमधील पैसा वितरित करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब अशी की जून महिन्याचा पैसा हा 20 जूनच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या संदर्भात अजून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही यामुळे या योजनेचा पैसा जून महिन्यात येणार की जुलै महिन्यात येणार ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

भारतीय टपाल जीवन विमा विभाग, उत्तर मुंबई अंतर्गत १० वी पास उमेदवारांसाठी टपाल जीवन विमा अभिकर्ता (Agent) भरती अंतर्गत नोकरीची संधी

IPLI North Mumbai Recruitment 2025 - Indian Postal Life Insurance Department, North Mumbai has arranged interviews on.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *