सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे २९० पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ डिसेंबर २०२५ आहे. अर्ज प्रक्रिया २० नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. उमेदवारानी अधिकृत वेबसाईट वर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचुन दिलेल्या तारखेच्या आत अर्ज सादर करावा.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार mjp.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी सुरू होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 19 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात
या अंतर्गत उमेदवारांची बऱ्याच पदांवर भरती केली जाणार असून यामध्ये जुनिअर इंजिनीअर (सिव्हिल) ची सर्वाधिक म्हणजेच 144 पदे, सिव्हिल इंजिनीअर असिस्टंटची 48 पदे, जुनिअर क्लर्क/ क्लर्क टायपिस्टची 46 पदे आणि जुनिअर इंजिनीअर (मॅकेनिकल) ची 16 पदे समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, अकाउंट ऑफिसर, असिस्टंट अकाउंट ऑफिसर, स्टेनोग्राफर, असिस्टंट स्टोरकीपर आणि इंतर पदांवर सुद्धा भरती केली जाणार आहे.
या भरतीसाठी पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. काही पदांसाठी B.Com, B.E. किंवा B.Tech डिग्री अनिवार्य आहे. तसेच, काही पदांवर नियुक्त होण्यासाठी डिप्लोमा, 10 वी उत्तीर्ण अशा संबंधित क्षेत्रात मास्टर्स डिग्री असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन तपासणं गरजेचं आहे
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन दिलं जाईल. इंटरनल ऑडिट ऑफिसर किंवा सीनियर अकाउंट्स ऑफिसर यांसारख्या उच्च पदांसाठी दरमहा 56,100 ते 1,77,500 पगार देण्यात येईल. तसेच, जुनिअर इंजिनीअर (सिव्हिल/मॅकेनिकल) आणि लोअर ग्रेड स्टेनोग्राफर पदांसाठी दरमहा 38,600 से 1,22,800 वेतन दिलं जाईल. याशिवाय, जूनियर क्लर्क आणि असिस्टंट स्टोरकीपर साठी 19,900 ते 63,200 रुपये तसेच, सिव्हिल इंजिनीअरिंग असिस्टंट पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 पगार दिला जाईल.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी प्रवर्गानुसार शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. जनरल (Open) प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये शुल्क आणि ओबीसी, एससी, PWD प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये शुल्क भरावं लागेल. याशिवाय, एक्स सर्व्हिसनमन (माजी कर्मचारी) कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati