वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नवीन बातमी ! आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका, शिपाई इत्यादी पदे रिक्त आहेत ! Health worker, Peon Bharti in Health Center 2026

एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे. ग्रामीण भागातील साहूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बऱ्याच वर्षांपासून विविध पदे रिक्त आहेत. या आरोग्य केंद्रात परिचारिका, आरोग्य सेविका, शिपाई आणि इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे गोर गरीब लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही रिक्त पदे लवकरात लवकर भरणे आवश्यक आहे . याविषयी अधिक माहिती जाणून घ्या. 

Health worker, peon Bharti in Health Centre 2026

तसेच , ग्रामीण भागातील गरीब गरजू जनतेला केंद्रबिंदू मानून सामान्य जनतेसाठी आधारवड मानल्या जाणाऱ्या साहूर प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील अनेक वर्षापासून महत्त्वाची बरेच  पदे रिक्त असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असल्याचे दिसून येत आहे. आणि  साहूर प्राथमिक आरोग्य केंद्र एकमेव आरोग्य केंद्र असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका, आरोग्य सेवक, शिपाई व इतर कर्मचाऱ्यांची पदे मागील अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने आरोग्य व्यवस्थेला जणू रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. मात्र याचा त्रास गोरगरीब रुग्णांना बसत असून तातडीच्या उपचारासाठी गरिबांना खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे.  उपचारासाठी गोरगरीब लोकांना जास्त पैसे द्यावे लागतात. काही लोकांना तर खाजगी रुग्णालयाचा खर्च करणे न परवडणारे आहे. परंतु त्यांचा नाईलाज आहे.

गेल्या चाळीस वर्षापूर्वी येथील आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी इमारत बांधण्यात आली होती. मात्र निकृष्टबांधकामामुळे या इमारतीला अल्पावधीत तडे गेले असूनही इमारत अगदी पाण्याच्या अवस्थेत आहे त्यामुळे या इमारतीतील आरोग्य केंद्र बाजूच्या धर्म शाळेत स्थलांतरित केले.आहे. सदर जिर्णमारत हिसमेटल करणे गरजेचे असताना अद्यापही ही इमारत तसीच उभी आहे त्यामुळे येथे अपघाताची शक्यता आहे.

त्यातल्या त्यात  येथील आरोग्य केंद्र धर्मशाळेतील अगदी छोट्याशा इमारतीत स्थलांतरित केल्याने येथील  रुग्णांना पुरेशा सोयी सुविधा पुरविल्या जाऊ शकत नाही. साहूर येथील आरोग्य केंद्रात कर्मचायांची गेल्या अनेका वर्षापासून रिक्त पदांची संख्या जास्त असल्या कारणाने  येथील रुग्णांना तालुक्याच्या  ठिकाणी पायपिट करून जावे लागत आहे.

नागरिकांनी मागणी केली आहे की , लोकप्रतिनिधी सह आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष द्यावे. साहूर  येथील आरोग्य केंद्राला सुसज्ज इमारतीचे व कर्मचाऱ्यांचे रिक्त पदाचे ग्रहण लागले असल्याने अनेक वेळा रुग्णांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. तसेच आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी येणाऱ्या  महिलांची तर मोठी कुचंबना होत आहे. रुग्णांना जागे अभावी व कर्मचाच्या अभावी वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवावर बेतण्याची भीतीव्यक्त  केली जात आहे. याबाबत अनेकदा वर्तमानपत्रातून तसेच आरोग्य केंद्रा कडून पत्रत्यवहाराद्वारे शासन प्रशासनाला रिक्त पदांची  माहिती पुरवलेली आहे.

अपुऱ्या कर्मचाऱ्यावर ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शासन प्रशासनाने जातीने लक्ष घालून रिक्त पदे भरली तर आणखी सक्षमपणे आरोग्य सेवा नागरिकांना देता येईल. मात्र अनेकदा लेखी पत्राद्वारे व वर्तमानपत्रातून कित्येकदा कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदे भरण्याबाबत मागणी केली असता त्याकडे शासनासह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. याविषयी शासनाने दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

सक्सेस इलेक्ट्रॉनिक्स, अहिल्यानगर – विक्री व्यवस्थापक/खरेदी व्यवस्थापक/ऑफिस बॉय पदांच्या ५ भरती सुरु ; त्वरित संपर्क करा !

Success Electronics Recruitment 2026 - Success Electronics Private Limited, Ahilyanagar invites Offline applications......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *