वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

JEE च्या परीक्षेप्रमाणे NEET ची परीक्षा दोन टप्प्यामध्ये होणार ; केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर ! Like the JEE exam, the NEET exam will be conducted in two phases.

New information has emerged: much like the JEE, the NEET examination is also set to be conducted in two phases. In an affidavit submitted to the Supreme Court, the Central Government clarified that the proposal to transition the NEET exam to a computer-based test is currently under active consideration. to implement a model akin to the JEE in a phased manner. The affidavit also states that a final decision will be taken only after considering the recommendations of the high-level task force, consulting all stakeholders, and providing adequate advance notice to the students.

नवीन बातमी समोर आलेली आहे . आता JEE च्या परीक्षे सारखे NEET ची परीक्षा सुद्धा दोन टप्प्या मध्ये घेण्यात येणार आहे.  असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ‘नीट’ परीक्षेचे संगणक आधारित चाचणीमध्ये  रूपांतरण सध्या सक्रिय विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच जेईईप्रमाणे ही परीक्षा दोन टप्प्यांत ऑनलाईन घेण्याचा विचारही करण्यात येत आहे. ‘जेईई’सारख्या मॉडेलची सुरुवात टप्प्याटप्प्याने करण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच  उच्चस्तरीय कार्य दलाच्या शिफारशींचा विचार केल्यानंतर सर्व संबंधित घटकांशी सल्लामसलत करून आणि विद्यार्थ्यांना पुरेशी पूर्वसूचना दिल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

NEET Exam 2026

नीट पेपरफुटीच्या वादानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) परीक्षा प्रक्रियेत व्यापक फेरबदल केले आहेत. राष्ट्रीय प्रवेश परीक्षांची अखंडता सुनिश्चित करण्यासाठी आता बहुस्तरीय सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारकडून न्यायालयाला देण्यात आली आहे. एनटीएमध्ये संरचनात्मक सुधारणांची मागणी करणाऱ्या याचिकांना उत्तर देताना, केंद्राने न्यायालयाच्या २९ मे २०२६ च्या आदेशानुसार अवलंबलेल्या उपाययोजनांचा तपशील सादर केला.

एनटीएने अनेक राष्ट्रीय परीक्षा संगणक आधारित चाचणीमध्ये रूपांतरित केल्या असल्या तरी नीट ही तिच्या व्याप्तीमुळे आणि सर्वसमावेशकतेमुळे लेखी स्वरूपात घेतली जाणारी एकमेव प्रमुख परीक्षा आहे. या परीक्षा प्रक्रियेत अलीकडे करण्यात आलेल्या सुधारणांची माहिती शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागातील सचिव अरविंद कुमार सिन्हा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

सरकारने स्पष्ट केले की, कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंचे विचारमंथन केले जाईल. विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करणे आणि परीक्षेची विश्वासार्हता वाढवणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रतिज्ञापत्रातून दिसून येते. या बदलांमुळे भविष्यात नीट अधिक सुरक्षित आणि तंत्रज्ञानयुक्त होण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण व्यक्त केले जात आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

IBPS Bharti 2026

IBPS द्वारे ११४०३ कलर्क पदांची मोठी भरती ; बँकेत काम करण्याची सुवर्ण संधी ! IBPS Bharti 2026

A golden opportunity has arisen for young people aspiring to work in the banking sector. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *