वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MPSC गट -क पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ ; १० ऑगस्ट २०२६ अंतिम तारीख ! MPSC Bharti 2026

There is good news for young aspirants. The application deadline for the MPSC (Maharashtra Public Service Commission) Group-C Services Combined Preliminary Examination 2026 has been extended. MPSC Bharti 2026  The new last date to apply is August 10, 2026. This examination process aims to fill 5,707 vacancies. Interested and eligible candidates can apply by visiting the official website. Further details are provided below.

तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट -क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२६ यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढविणात आलेली आहे. MPSC Bharti 2026 आता अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२६ ही आहे. या परीक्षेच्या मार्फत ५७०७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकतात. अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

  MPSC Bharti 2026 for Group C posts

महाराष्ट्र लोकसेवाआयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा  -२०२६ साठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ जाहीर केली आहे. उमेदवारांच्या मागणीचा विचार करून अर्ज भरण्याची अंतिम मुदत (Application deadline) १० ऑगस्ट २०२६ (August 10,2026) रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत १३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे एकूण ५,७०७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पूर्वी प्रसिद्ध झालेल्या शुद्धीपत्रकानुसार विविध मागण्यांचा समावेश करून पदसंख्या वाढविण्यात आली आहे.

यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. त्यांनी ‘My Account’ पर्यायातून संबंधित माहिती अद्ययावत करावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी नियुक्तीपूर्वी करण्यात येईल. पात्रता सिद्ध न झाल्यास उमेदवार नियुक्तीस अपात्र ठरेल. याबाबतचे शुद्धीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दरम्यान, मुंबई नगरपाल कार्यालयातील बेलिफ-लिपिक, गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. पेपर एक सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत तर पेपर दोन दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत होणार आहे. अभ्यासक्रम आणि निवड प्रक्रियेचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणेच राहील.

अर्ज केलेल्या उमेदवारांना स्थायी किंवा कायमस्वरूपी निवासाच्या तपशीलानुसार जिल्हा केंद्र उपलब्ध करून दिले जाईल. परीक्षेच्या सात दिवस आधी प्रवेश प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज प्रणालीतील उमेदवारांच्या प्रोफाइलमध्ये उपलब्ध होईल. १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या मूळ जाहिरातीतील व ३० जून २०२६ रोजी जारी केलेल्या शुद्धीपत्रकातील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

SBI Bank 9677 Posts Bharti 2026

SBI बँक अंतर्गत ९७६६ क्लर्क पदांची भरती ! SBI Bank 9766 clerk posts Bharti 2026

A golden opportunity to work at SBI! This is a great chance for candidates aspiring …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *