वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सरकारी नोकरीची संधी ! पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत २८९ शिपाई पदांची भरती सुरु; पात्रता १२वी पास ! त्वरित अर्ज करा ! PDCC Bank Bharti 2026

An important update has been released for candidates who have passed the 12th standard and for young people seeking government jobs. An official advertisement has been published for the direct recruitment of 289 Peons at the Pune District Central Cooperative Bank (PDCC Bank). Interested and eligible candidates are required to apply online. Applications must be submitted via the bank’s official websites: https://www.pdcc.bank.in/careers or https://www.punedccbank.com. The online application window remains open until 11:59 PM on August 10, 2026. Read on for detailed information.

१२ पास उमेदवार तसेच जे तरुण  सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. PDCC  bank Bharti 2026 पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके अंतर्गत  शिपाई  पदासाठी  तब्बल २८९ रिक्त जागांवर सरळसेवेद्वारे भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने  बँकेचे अधिकृत संकेतस्थळ https://www.pdcc.bank.in/careers किंवा https://www.punedccbank.com वर जाऊन भरावे लागतील. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२६  रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सविस्तर माहिती जाणून घ्या. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

PDCC Bank Bharti 2026
PDCC Bank Bharti 2026

उमेदवारांना अर्जासोबत १६५० रुपये अधिक १८ टक्के जीएसटी व सर्व्हिस चार्ज इतके परीक्षा शुल्क ऑनलाईन जमा करणे आवश्यक आहे. आणि शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवाराने १ ऑगस्ट २०२६ रोजी किमान इयत्ता १२ वी किंवा समकक्ष पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे इतकी पाहिजे , तसेच  PDCC बँकेत कंत्राटी तत्त्वावर सलग तीन वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ही  ४३ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. उमेदवाराजवळ  पुणे जिल्ह्याचा किमान १५ वर्षांचा मूळ रहिवासी असण्याचे प्रमाणपत्र  आणि सन २०१८ नंतरचे अधिवास प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.

या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने लेखी परीक्षालेखी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र आणि वेळापत्रक बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाईल. उमेदवारांकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणेही गरजेचे आहे. अधिकृत वेबसाइट https://pdcc.bank.in/ वरून सविस्तर जाहिरात आणि अर्ज प्रक्रिया पाहता येईल.

त्याचप्रमाणे ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध राहणार असल्याने पात्र उमेदवारांनी ही चांगली संधी गमावू नये. तसेच अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि सर्व अटींची पूर्तता करणाऱ्यांनीच अर्ज वेळेत सादर करावा.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

IBPS Bharti 2026

IBPS द्वारे ११४०३ कलर्क पदांची मोठी भरती ; बँकेत काम करण्याची सुवर्ण संधी ! IBPS Bharti 2026

A golden opportunity has arisen for young people aspiring to work in the banking sector. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *