There is excellent news for young men and women from Maharashtra who aspire to serve the nation as officers in the Indian Army. As an alternative to expensive coaching classes, the State Government has opened the doors to free training. The Government of Maharashtra has launched a special, free initiative in Nashik to prepare candidates for the Services Selection Board (SSB) interview—a crucial step in becoming an army officer. Read on for detailed information.
ज्या तरुणांना भारतीय लष्करात अधिकारी पदावर देशसेवा करण्याची इच्छा आहे त्या महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. महागड्या कोचिंग क्लासेसला पर्याय म्हणून राज्य शासनाने मोफत प्रशिक्षणाची दारे खुली केली आहेत. सैन्यात अधिकारी बनण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीच्या तयारीसाठी महाराष्ट्र शासनाचा नाशिक येथे विशेष मोफत उपक्रम सुरु केला आहे. सविस्तर माहिती जाणून घ्या.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय स्थलसेना,नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना ‘सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड’ (SSB) मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाशिक रोड, नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी २१ सप्टेंबर २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणासोबतच निवास व भोजनाची सुविधाही निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता :
- या प्रशिक्षण वर्गात प्रवेशासाठी उमेदवाराने खालीलपैकी कोणतीही एक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे:
‘कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन’ (CDSE-UPSC) किंवा ‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन’ (NDA-UPSC) उत्तीर्ण होऊन जे उमेदवार SSB मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. - ‘NCC स्पेशल एंट्री’ साठी ज्यांच्याकडे SSB मुलाखतीचे कॉल लेटर (पात्रता पत्र) आहे.
‘टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स’ (TGC) किंवा ‘युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम’ (UES) साठी SSB मुलाखतीचे कॉल लेटर आलेले अथवा SSB साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असलेले उमेदवार.
पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati
