The deadline for completing the e-KYC process for teaching and non-teaching staff in aided, partially aided, and Zilla Parishad schools—who receive their salaries through the ‘Shalarth’ system in Maharashtra—has now been extended to October 5, 2026. The Education Department has issued a clear warning regarding this matter, stating that failure to complete the process by the stipulated deadline will result in the withholding of the concerned employees’ salary for October (payable in November); the department has emphasized that this warning should be taken seriously.
महाराष्ट्र राज्यातील शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या अनुदानित, अंशतः अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत आता ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भात स्पष्ट इशारा दिला आहे की, दिलेल्या अंतिम मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन, जे नोव्हेंबरमध्ये देय आहे, ही कारवाई गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही विभागाने नमूद केले आहे.

वित्त विभाग आणि शासनाच्या सूचनेनुसार शालार्थ तसेच सेवार्थ प्रणालीतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी शिक्षण संचालनालयाने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबरपर्यंतची मुदत निश्चित केली होती. मात्र, क्षेत्रीय स्तरावर आढावा घेतला असता अनेक कर्मचाऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप अपूर्ण असल्याचे तसेच तांत्रिक अडचणींमुळे अतिरिक्त वेळ लागण्याची शक्यता असल्याचे समोर आले. त्यामुळे राज्यभरातील हजारो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार ५ ऑक्टोबर २०२६ ही ई-केवायसीसाठी अंतिम तारीख असेल आणि यापुढे कोणत्याही परिस्थितीत आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच दिलेल्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे चे वेतन (देय नोव्हेंबर २०२६) मध्ये थांबवले जाईल. शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात सर्व संबंधितांना अत्यंत गांभीर्याने याची नोंद घेऊन आपल्या स्तरावरून सर्व शाळांना तात्काळ सूचना देण्याचे आदेश दिले आहेत.
ही प्रक्रिया खाजगी व्यवस्थापनाच्या अंशतः अनुदानित, पूर्ण अनुदानित तसेच जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक आहे. कर्मचाऱ्यांनी विलंब न करता ई-केवायसी पूर्ण करावी, अन्यथा वेतनाबाबत अडचण निर्माण होऊ शकते. विभागाने याबाबत दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati