वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

BHEL अंतर्गत सुपरवाइजर पदांच्या ५३० रिक्त जागेची भरती सुरु ! BHEL Bharti 2026

An advertisement has been released for the recruitment of 530 Supervisor positions at Bharat Heavy Electricals Limited (BHEL). Interested and eligible candidates should apply via the official BHEL website before September 12, 2026. For further details, please click the link provided below.

BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत एकूण ५३० सुपरवाइजर पदांच्या रिक्त जागेच्या भरतीची जाहिरात झालेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १२ सप्टेंबर २०२६ पूर्वी अर्ज BHEL  च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

BHEL Bharti 2026
BHEL Bharti 2026

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) च्या तिरुचिरापल्ली प्लांटमध्ये २०२६-२७ या वर्षासाठी अप्रेंटिस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. कंपनीने एकूण ५३० पदांसाठी अधिसूचना जारी केली असून यात ९० ग्रॅज्युएट अप्रेंटिस, ६० टेक्निशियन अप्रेंटिस आणि ३८० ट्रेड अप्रेंटिस यांचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाची अप्रेंटिसशिप ट्रेनिंग बीएचईएल तिरुचिरापल्ली, तमिळनाडू येथे दिली जाईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर २०२६ आहे. अर्ज बीएचईएल तिरुचिरापल्लीच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरून सादर करावे लागतील आणि यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आले नाहीत.

ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी यांत्रिक, सिव्हिल, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स यासह अकाउंटंट आणि असिस्टंट-एचआर या विषयातील पदवी आवश्यक आहे. टेक्निशियन अप्रेंटिससाठी दहावीसोबत संबंधित विषयातील डिप्लोमा तर ट्रेड अप्रेंटिससाठी दहावीसोबत एनसीव्हीटी किंवा एससीव्हीटी मान्यताप्राप्त आयटीआय आवश्यक आहे. ट्रेड अप्रेंटिसमध्ये फिटरसाठी १२५, वेल्डरसाठी ११५, इलेक्ट्रिशियनसाठी ३०, टर्नर आणि मशिनिस्टसाठी प्रत्येकी २० तर सीओपीएसाठी ४५ पदांचा समावेश आहे. इतर काही ट्रेडसाठीही जागा उपलब्ध आहेत,

उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२६ रोजी १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांना पाच वर्षे, ओबीसी-एनसीएलला तीन वर्षे तर किमान ४० टक्के दिव्यांग उमेदवारांना दहा वर्षांची वयोमर्यादा शिथिलता मिळेल. पदवी, डिप्लोमा किंवा आयटीआय पात्रता २०२२ ते २०२६ या कालावधीत पूर्ण झालेली असावी. यापूर्वी अप्रेंटिसशिप पूर्ण केलेले किंवा एक वर्ष किंवा त्याहून अधिक कामाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत.

निवड प्रक्रिया संबंधित पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या मेरीट लिस्टनुरूप होईल. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचून सर्व अटी व शर्ती तपासूनच अर्ज करावा. ही संधी अभियांत्रिकी पदवीधर, डिप्लोमाधारक आणि आयटीआय उत्तीर्ण तरुणांसाठी व्यावसायिक अनुभव मिळवण्याची उत्तम संधी आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Mahsul sevak Bharti 2026

आनंदाची बातमी ! महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या २९९२ रिक्त जागेसाठी भरती सुरु ! संपूर्ण माहिती जाणून घ्या – Revenue Servant (Kotwal) Bharti 2026

A total of 2,992 vacancies for the post of Revenue Servant (Kotwal) under the Revenue …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *