वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

‘सी-टीईटी’ परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेस प्रारंभ ; 8 फेब्रुवारी ला होणार परीक्षा !

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सी-टीईटी परीक्षा घेणार आहे. या परीक्षेसाठी २७ नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, १८ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याने सी-टीईटी देणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

CTET Apply online 2026

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात ‘सीबीएसई’तर्फे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट (सी-टीईटी) ८ फेब्रुवारी २०२६ ला घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना १८ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहे.

राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नुकतीच शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत राज्यभरात पेपर फुटण्यासह विद्यार्थ्यांना चुकीच्या माध्यमाचा पेपर मिळण्यापर्यंत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यानंतर आता सी-टीईटीची अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे राज्यात नुकत्याच झालेल्या टीईटी परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली होती.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *