वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !! Neet PG Exam 2025 15 जून रोजी होणारी परीक्षा स्थगित ! सविस्तर वाचा

वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेबाबत मोठी बातमी आहे. (NEET PG Exam 2025) सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशानंतर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने (NBEMS) नीट परीक्षा पुढे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

ही परीक्षा येत्या 15 जून रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच नीटची परीक्षा ही दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आता दुसरा निर्णय घेत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

NEET PG Exam 2025 Postponed supreme court decision

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने नीट परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये होणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच 15 जून रोजी घेण्यात येणारी परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

नीटच्या परीक्षेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी ती दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. त्यासाठी आधी नियोजित केंद्रांपेक्षा अधिक केंद्रांची आणि इतर मूलभूत गोष्टींची गरज पडणार आहे. त्यामुळेच ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे. या संबंधित पुढची तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येईल असंही नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशनने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, या परीक्षेची नवीन तारीख जाहीर झाल्यानंतर परीक्षेच्या चार दिवस आधी परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. उमेदवारांना https://natboard.edu.in/ या अधिकृत वेबसाइटवर हे हॉलतिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून उमेदवारांना ते डाऊनलोड करता येईल. याशिवाय हॉलतिकीट शिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही असेही सांगण्यात आले आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

10th and 12th exam fee 2026

10 वी, 12वी परीक्षा शुल्क माफ ; शिक्षण मंडळाची घोषणा ! 10th and 12th Exam fee 2026

Many families in Maharashtra are facing financial hardships due to the looming threat of drought. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *