JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मराठा समाजालाही नॉन क्रीमिलेअरची अट !!!

The state government has implemented reservation for the Maratha community socially and educationally, and now the principle of advanced and advanced group i.e. non-creamy layer certificate has been implemented to benefit from the reservation. Therefore, only those families whose annual income is less than eight lakh rupees will be able to get the benefit of this reservation. Therefore, it is now clear that almost all citizens of the Maratha community will not get the benefit of reservation.

राज्य सरकारने मराठा समाजाला  सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या आरक्षण लागू केले असून, आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आता उन्नत व प्रगत गटाचे तत्त्व अर्थात नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र लागू करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत असेल, अशांनाच या आरक्षणाचा लाभ मिळू शकणार आहे. त्यामुळे मराठा समाजातील सरसकट सर्व नागरिकांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय २० फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनात घेतला त्यानंतर राज्यपालांनी या अध्यादेशाला २६ फेब्रुवारी अधिनियमाचे स्वरूप देऊन तो राज्यभरातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये तसेच राज्य सरकारच्या शासकीय व निमशासकीय सेवेतील सरळ सेवा भरतीच्या पदांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला.

या आरक्षणासाठी आता राज्य सरकारने एक नवीन अट लागू केली आहे. त्या संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून, इतर मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमातींसाठी लागू असलेले उन्नत व प्रगत गट अर्थात नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी उत्पन्नाची वार्षिक मर्यादा ८ लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *