वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

बेरोजगार उमेदवारांसाठी नोकरीची संधी ! रेल्वे कोच फॅक्टरी मध्ये प्रशिक्षणार्थी पदांसाठी ७३४ रिक्त जागेची भरती ! Rail Coach Factory Bharti 2026

A golden job opportunity for unemployed youth! A new recruitment notification has been published for a total of 734 apprentice vacancies at the Rail Coach Factory. Candidates must apply online for this recruitment by September 5, 2026. Applications should be submitted via the official Rail Coach Factory website (indianrailways.gov.in). Please review the detailed information regarding the number of posts, designations, educational qualifications, age limits, etc.

बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी ! रेल कोच फॅक्टरी अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांसाठी एकूण ७३४ रिक्त जागेच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. Rail Coach Factory Bharti 2026 या भरती साठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन  पद्धतीने ५ सप्टेंबर २०२६ पर्यंत करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज रेल कोच फॅक्टरी च्या अधिकृत वेबसाईट  indianrailways.gov.in वर क्लिक करून भरावा व वेळेत सादर करावा. पदांची संख्या , पदांची नावे , शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. संधर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

Rail Koach Bharti 2026

तरुणांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रेल कोच फॅक्टरी द्वारे प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७३४ रिक्त जागा  भरण्यासाठी जाहिरात नुकतीच  प्रसिद्ध  झालेली आहे. आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ५ सप्टेंबर २०२६ अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.   या भरतीसंदर्भातील सर्व सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळ indianrailways.gov.in वर दिलेली आहे .

या भरती अंतर्गत फिटर, वेल्डर, मशिनीस्ट, पेंटर, सुतार, इलेक्ट्रीशियन, एसी अँड रेफ्रिजरेशन मेकॅनिक, मोटर वाहन मेकॅनिक आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक यांसारख्या विविध ट्रेड्समध्ये जागा भरण्यात येणार आहेत. एकूण ७३४ जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग तसेच अपंग आणि माजी सैनिकांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

वयोमर्यादा किमान १५ ते कमाल २४ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. अर्ज शुल्क १०० रुपये आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी किंवा समकक्ष परीक्षा किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. तसेच नोटीफाईड ट्रेडमध्ये नॅशनल कौन्सिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग (एनसीव्हीटी) कडून जारी केलेले नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (एनटीसी) असणे आवश्यक आहे. अधिक तपशीलासाठी मूळ जाहिरात तपासणे गरजेचे आहे.

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

IOCL मध्ये ४७० पदांची मेगा भरती; त्वरित अर्ज करा ! IOCL Bharti 2026

An advertisement has been published for the recruitment of 470 vacancies across various posts at …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *