वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

TET उत्तीर्ण शिक्षकांच्या पदोन्नतीवरून वाद ; जाणून घ्या सविस्तर माहिती !

TET  उत्तीर्ण शिशक्षकांबाबत नवीन माहिती समोर आलेली आहे . टीईटी उत्तीर्ण शिक्षकांना महाराष्ट्रात पदोन्नती दिली जाणार नाही. यावरून वाद समोर आला आहे.  टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही शिक्षकांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अधिक माहिती जाणून घ्या.

TET Promotion Rules 2026

टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्‍या शिक्षकांना सेवाज्‍येष्‍ठतेनुसार पदोन्‍नती दिली जाणार आहे. त्यासाठी परीक्षा उत्तीर्ण झालेल्‍या शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याची प्रक्रिया जिल्‍हा परिषदेच्‍या सामान्य प्रशासनाकडून सुरू (TET Promotion Rules Maharashtra) आहे. मात्र या प्रक्रियेला जिल्ह्यातील काही शिक्षकांनी हरकत घेतली असून, उच्च न्यायालयात धाव घेत रीट पिटीशन दाखल केली आहे. त्यामुळे आता या प्रक्रियेमुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे

शिक्षकांना पदोन्‍नतीसाठी (Maharashtra Teacher Promotion) आता टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. न्यायालयाच्‍या निर्णयानुसार ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत टीईटी उत्तीर्ण करण्याची मुदत शिक्षकांना दिली आहे. अर्थात उत्तीर्ण झालेल्‍या शिक्षकांना सेवाज्‍येष्‍ठतेनुसार पदोन्‍नती दिली जाणार आहे. मुख्‍य म्‍हणजे दोन वर्षाच्‍या कालावधीत परीक्षा पूर्ण झाल्‍यानंतरच ही प्रक्रिया राबविणे क्रमप्राप्त होते.

असे असतानाही प्राथमिक शिक्षण विभागाकडून पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्याची घाई केली जात असल्‍याचे याचिकाकर्त्या शिक्षकांनी म्हटले आहे. टीईटी उत्तीर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना पदोन्नतीसाठी पात्र शिक्षकांना सीईओंच्या आदेशाने कागदपत्रासह जिल्हा परिषदेत बोलवण्यात आले आहे. यानंतर या प्रक्रियेला विरोध दर्शविला आहे

सर्वोच्‍च न्यायालयाने टीईटी परीक्षा शिक्षकांसाठी बंधनकारक केली आहे. त्‍या अनुषंगाने गेल्या वर्षी बहुतांश शिक्षकांनी परीक्षा दिली नाही. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर शासनाने टीईटी उत्तीर्ण होणाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी १९ जानेवारीला पत्र काढले आहे. पहिल्या परीक्षेपूर्वी कुठलेही आदेश नसल्याने शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली नाही. आता ८० टक्के शिक्षकांनी टीईटी दिली आहे. त्याचा निकाल लागण्यापूर्वीच प्रशासन पदोन्नत्या देण्याची घाई करत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे असून, जिल्‍हा परिषद प्रशासनाच्‍या प्रक्रियेविरोधात धनराज राजपूत यांच्यासह १८ शिक्षकांनी न्‍यायालयात याचिका दाखल केली आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *