वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

‘MPSC’ पूर्व परीक्षा २०२५ ची जाहिरात प्रकाशित , ३८५ पदांसाठी भरती; परीक्षा २८ सप्टेंबरला होणार ! त्वरित अर्ज करा

MPSC Prelims 2025 : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा योजनेतील सुधारणा संदर्भातील एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून २०२५ पासून होणाऱ्या राज्य सेवा मुख्य परीक्षा सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात येईल. याबाबत २३ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर एक प्रसिद्धीपत्रक प्रकाशित करण्यात आले होते.

त्याचाच एक भाग म्हणून, ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ संदर्भातील परिपत्रक आयोगाने जाहीर केले आहे. या परीक्षेत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील ३८५ रिक्त पदांसाठी भरती होईल: सामान्य प्रशासन विभाग (राज्य सेवा) – १२७ पदे, महसूल व वन विभाग (महाराष्ट्र वनसेवा) – १४४ पदे, सार्वजनिक बांधकाम विभाग (महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा) – ११४ पदे. ही परीक्षा २८ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेतली जाईल.

MPSC Prelims 2025

परीक्षेसाठी अर्जाची प्रक्रिया २८ मार्च २०२५ पासून सुरू होईल, आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ एप्रिल २०२५ आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख १७ एप्रिल २०२५ आहे, तर भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख १९ एप्रिल २०२५ आहे. तसेच, चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख २१ एप्रिल २०२५ असेल.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट: https://mpsconline.gov.in/candidate/login

नोटिफिकेशन लिंक: https://mpsc.gov.in/adv_notification/8

सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात येईल.

 

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

CBI – आकर्षक वेतनावर ‘या’ पदांच्या १५ भरतींसाठी अर्ज मुदतवाढ शुध्दीपत्रक

Central Bank Of India AGM Recruitment 2026 - Central Bank Of India invites Online applications in till the last date 25/05/2026 for....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *