वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

खुशखबर ! IBPS अंतर्गत १३७०६ पदांसाठी मोठी भरती ; त्वरित अर्ज करा ! IBPS Recruitment 2026

A golden job opportunity for graduates! A new recruitment notification has been published for 13,706 bank positions under the Institute of Banking Personnel Selection (IBPS). Interested candidates can apply for this recruitment until September 21, 2026. Applications must be submitted online. Please visit the official website for detailed information regarding the recruitment.

पदवीधर तरुण-तरुणींसाठी नोकरीची सुवर्ण संधी ! इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन IBPS अंतर्गत बँकेत १३७०६ पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार २१ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. भारतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइट वर क्लिक करून जाणून घ्या.  

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

IBPS Recruitment 2026

तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी  आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने (IBPS) देशभरातील विविध बँकांमध्ये एकूण 13,706 जागांसाठी मेगाभरतीची घोषणा केली आहे. या भरतीत ऑफिस असिस्टंट, असिस्टंट मॅनेजर ते वरिष्ठ अधिकारी पदांचा समावेश असून, इच्छुक उमेदवारांना 21 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

IBPS  मेगाभरती अंतर्गत  ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) पदासाठी सर्वाधिक 8,183 जागा आहेत. त्यापाठोपाठ ऑफिसर स्केल-वन (असिस्टंट मॅनेजर) साठी 4,256, ऑफिसर स्केल-टू जनरल बँकिंग ऑफिसरसाठी 666, आयटीसाठी 182, सीएसाठी 81, लॉसाठी 46, ट्रेझरी मॅनेजरसाठी 18, मार्केटिंग ऑफिसरसाठी 16, अ‍ॅग्रीकल्चर मॅनेजरसाठी 38 आणि ऑफिसर स्केल-थ्रीसाठी 220 जागा उपलब्ध आहेत. विविध पदांसाठी वेगवेगळ्या पात्रता शर्ती लागू आहेत.

ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल-वन पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी पुरेशी आहे. जनरल बँकिंग ऑफिसरसाठी पदवीसोबत किमान 50 टक्के गुण आणि दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. आयटी पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटीमधील पदवी व एक वर्षाचा अनुभव, सीएसाठी सीए प्रमाणपत्र व एक वर्षाचा अनुभव, तर लॉसाठी 50 टक्के गुणांसह एलएलबी आणि दोन वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे. ट्रेझरी मॅनेजरसाठी सीए किंवा एमबीए (फायनान्स), मार्केटिंगसाठी एमबीए (मार्केटिंग) आणि अ‍ॅग्रीकल्चर मॅनेजरसाठी कृषी संबंधित पदवी आवश्यक आहे. स्केल-थ्रीसाठी पदवीत 50 टक्के गुण आणि पाच वर्षांचा अनुभव हवा.

वयाची गणना 1 सप्टेंबर 2026 रोजी केली जाईल. ऑफिस असिस्टंटसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे, स्केल-वनसाठी 18 ते 30 वर्षे, स्केल-टूच्या पदांसाठी 21 ते 32 वर्षे आणि स्केल-थ्रीसाठी 21 ते 40 वर्षे आहे. अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना पाच वर्षे तर इतर मागासवर्गीयांना तीन वर्षांची सूट मिळेल.

अर्ज शुल्क ऑफिस असिस्टंटसाठी सामान्य व ओबीसी उमेदवारांना 850 रुपये तर एससी-एसटी, दिव्यांग व माजी सैनिकांना 175 रुपये आहे. अधिकारी पदांसाठीही सामान्य-ओबीसींसाठी 850 आणि आरक्षित वर्गांसाठी 175 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन राहील.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Post Graduate Course in Agriculture Admission 2026

कृषी पदव्युत्तर (PG) प्रवेशाची विशेष फेरी २१ सप्टेंबरपासून सुरू ! सविस्तर माहिती जाणून घ्या – Postgraduate course in agriculture Admission 2026

A center-wise centralized admission round for vacant seats in postgraduate agriculture and allied degree programs—offered …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *