वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आनंदाची बातमी !! ISRO मध्ये नोकरीची संधी ; पगार १ लाख ४२ हजार पर्यंत ! जाणून घ्या अर्ज कसा करायचा

इस्रोमध्ये नोकरी करण्याची इच्छित असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मार्फत सध्या विविध विभागांमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकऱ्यांसाठी आकर्षक पगार मिळणार असून, इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी मिळणार आहे.

तरुण उमेदवारांसाठी ही नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. इस्रोतर्फे टेक्निकल असिस्टंट, सायंटिस्ट, आणि लायब्ररी असिस्टंट अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी isro.gov.in आणि vssc.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.

ISRO Bharti 2025

अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: १८ जून २०२५, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.

इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

खालील विभागांमध्ये भरती होणार आहे:

टेक्निकल असिस्टंट – मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स, केमिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, रेफ्रिजरेशन

लॅब असिस्टंट

ग्रंथालय सहायक (Library Assistant)

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून खालील शाखांमध्ये डिप्लोमा घेतलेला असावा:

इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग

इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन

इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंग

मेकॅनिकल इंजिनियरिंग

ग्रंथालय सहायक पदासाठी स्नातक पदवी आवश्यक आहे.

वयोमर्यादा
उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षांदरम्यान असावे.

पगार
सहाय्यक पदासाठी पगार ₹44,900 ते ₹1,42,400 पर्यंत असणार आहे (7th Pay Commission नुसार).

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट यांच्या आधारे होणार आहे.

अर्ज शुल्क
सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹750 अर्ज शुल्क.

राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *