वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मोठी अपडेट !! लाडक्या बहिणींना जून चा हफ्ता आता जून महिन्याच्या शेवटी मिळणार ! कारण काय ? ते जाणून घ्या

माझी लाडकी बहीण योजनेचा जून चा हफ्ता महिलांना कधी मिळणार ? याचा प्रश्न लाभार्थी महिलांना पडलेला आहे. आधी असे सांगण्यात आले होते की ; २० जून ला पैसे खात्यात जमा होतील. पण ते जमा झाले नाही. आता या योजने बद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. जून चा हफ्ता लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या शेवटी मिळेल. जाणून घ्या सविस्तर माहिती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचा १२ व हफ्ता कधी मिळणार ? लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत.

Ladki Bahin June installment recieve at the end of June

आतापर्यंत या योजने अंतर्गत लाडक्या बहिणींना एकूण ११ हफ्ते मिळाले आहे. दरमहा त्यांना १५०० रुपये मिळाले. जून चा १२ वा हफ्ता कधी भेटेल याची त्या आतुरतेने वाट पाहत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 2025 या कालावधी मधील एकूण 11 हप्ते देण्यात आले आहेत.

मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला महिलांचा खात्यात जमा करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जून महिन्याचा हप्ता 15 ते 20 जून दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नाही.

जून महिन्याची  20 तारीख उजाडली असल्याने याचा बारावा हफ्ता कधीपर्यंत खात्यात जमा होणार हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान मीडिया रिपोर्ट मध्ये जून महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेचा बारावा हफ्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होईल असा दावा केला जातोय. म्हणजे त्या दोन आठवड्यात लाडक्या बहिणींना बारावा हप्ता मिळू शकतो असे सांगितले जात आहे.

याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही यामुळे जून महिन्याचा लाभ महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार की जुलै महिन्यात जून महिन्याचे पैसे मिळणार ही गोष्ट पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

लाडकी बहिण योजना ही मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या योजनेची घोषणा गेल्या वर्षी जून महिन्यात करण्यात आली होती. तसेच याचा लाभ जुलै 2024 पासून दिला जातोय. या अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण अकरा हप्ते मिळाले आहेत.

या योजनेचा लाभ राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना दिला जातोय. त्याचा लाभ अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मिळतोय. याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळतो.

सरकारी नोकरदार असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळत नाही. ज्या महिलांना इतर योजनांचा लाभ मिळतो अशा महिला सुद्धा या योजनेतून वगळण्यात आल्या आहेत. ट्रॅक्टर वगळता इतर चार चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना देखील याचा लाभ मिळत नाही.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *